👁 6 Views

मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी शिबीर

पंढरपूर Live 11 December 2017

देशाचे माजी कृषीमंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने महीलांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे मंगळावार दिनांक 12 डिसेंबर रोजी पुंडलीक महाराज मठ,जयभवानी चौक येथे आयोजीत करण्यात आले आहे अशी माहीती या शिबीराचे संयोजक व राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष गुरुराज अभंगराव यांनी दिली आहे.
               या शिबीराच्या आयोजनाबाबत माहीती देताना गुरुराज अभंगराव म्हणाले की,स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महीलांंना 50 टक्के प्रतिनिधीत्व देण्याच्या निर्णय राष्ट्रवादी कॉग्रेसमुळे अमलात आला.महीलांमध्ये सामाजिक तसेच राजकीय जनजागृती झाली पाहीजे हीच भुमिका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खा.सुुप्रिया सुळे या सातत्याने मांडत असतात.महीलांच्या आपल्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही गंभीर बाब असून त्यामुळेच वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने महीलांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे.
         या शिबीराचे उदघाटन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके,राष्ट्रवादी कॉग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव,शहराध्यक्ष सुधीर भोसले,राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रंजना हजारे,शहराध्यक्ष संदीप मांडवे,ता.किसान सभा अध्यक्ष कृष्णा माळी,ता.अल्पसंख्याक  विभाग अध्यक्ष गुलाब मुलाणी,विद्यार्थी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुजीत गायकवाड,राष्ट्रवादी कॉग्रेस युवती शहराध्यक्षा चारुशिला कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रवादी  कॉग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
      तरी या आरोग्य तपासणी शिबीराचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव यांनी केले आहे.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *