शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
देशाचे माजी कृषीमंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस व विद्यार्थी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने येथील कोळी समाज मठात महीलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते.या शिबीरात हेमोग्लोबीन तसेच जेष्ठ महिलांसाठी मधुमेह तपासणी आदी आवश्यक तपासण्या करण्यात आल्याची माहीती राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव यांनी दिली आहे.
दिवसभर आपल्या कटुुंबासाठी राबणार्या महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच उरत नसतो.त्यामुळे महिलांना आरोग्यतपासणीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्ेशाने राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने महीलांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत या कार्यक्रमाचे या शिबीराचे उदघाटन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अभिजीत साळुंखे यांनी केले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले,जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके,राष्ट्रवादी कॉग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव,शहराध्यक्ष सुधीर भोसले,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, ओबीस विभाग शहर अध्यक्ष अनिल सप्ताळ,मारुती जाधव, कार्याध्यक्ष मनोज आदलींगे, शहर संपर्क प्रमुख विजय मोरे,शहर उपाध्यक्ष निलेश कोरके,शहर सचिव सागर कावरे,प्रभाग अध्यक्ष गणेश माने,प्रभाग अध्यक्ष वैभव शिवशरण,प्रभाग अध्यक्ष रविंद्र आटपाडकर,ओबीसी विभाग महिला जिल्हाध्यक्ष साधना राऊत,महीला शहराध्यक्ष रंजनाताई हजारे,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी,शहाध्यक्ष रशीद शेख,शहर उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी,सेवादल जिल्हाकार्याध्यक्ष दिलीप भोसले,दिलीप साबळे,जिल्हाकार्याध्यक्ष सुधामती माळी,महीला तालुकाध्यक्ष अनिता पवार,तालुकाध्यक्ष जयश्री माडगुळकर,शहराध्यक्ष मनिषा शिंदे,वनिता घोडके,अनिताा नगरे,युवती शहराध्यक्ष चारुशिला कुलकर्णी,उपाध्यक्षा प्राजक्ता पवार, विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष ॠषीकेश पवार,उपाध्यक्ष जय देशमाने,शुभम साळुंखे,सागर अभंगराव,सुजीत ननवरे,अभिषेक लवंड,आकाश आदमीले,बंटी आटकळे,सुहास कदम,अक्षय कोकीळ यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉग्रेस व विद्यार्थी कॉग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







