पंढरपूर Live 12 December 2017
येथील जेष्ठ ग्रामीण साहित्यिक व समीक्षक डॉ. द. ता. भोसले यांना यावर्षीचा राज्यशासनाचा रा. ना.चव्हाण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हे पुरस्कार मराठी भाषा विभागाच्या वतीने दिले जातात. डॉ. द.ता.भोसले आणि रा. रं. बोराडे यांच्या शिवारातील शब्दशिल्पकार या संपादित ग्रंथासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, व मानपत्र असे असून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.
डॉ. द. ता. भोसले हे ग्रामीण साहित्याचे भाष्यकार मानले जातात. त्यांच्या लेखणीने ग्रामीण साहित्य आणि संस्कृती समृद्ध झाली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने एकूण मराठी साहित्यविश्वामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








