श्री दर्लिंग विद्यामंदीरचे शिक्षकेतर कर्मचारी मारुती मिसाळ यांना मराठा सेवा संघ व डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, पंढरपूर पुरस्कार मिळाल्यामुळे सिव्हील इंजिनिअरींगचे विभाग प्रमुख डॉ. एन.व्ही.खडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सोबत हनुमंत डोंगरे, संतोष हलकुडे.
पंढरपूर Live 12 December 2017
पुरस्कार प्राप्त शिक्षकेतर कर्मचारी मिसाळ यांची स्वेरीला सदिच्छा भेट
पंढरपूर-श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर अर्थात स्वेरी’ शिक्षण संस्था ही जिल्ह्याला तंत्रज्ञान शिक्षणासाठी मिळालेली मोठी देणगी असून स्वेरीतील पंढरपूर पॅटर्न’शिक्षण पद्धतीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष पर्वणी ठरत आहे. स्वेरीने संशोधन क्षेत्रात केलेली प्रगती ही आमच्या विद्यार्थ्यांना देखील विकासाच्या शिखराकडे घेवून जात आहे. त्यामुळे मुळात इंग्रजीचा न्यूनगंड बाळगणारा ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वेरीमुळे धाडसाने इंग्रजीतूनच शिक्षण घेण्याचे ध्येय बाळगत आहे. त्यामुळे स्वेरी’ ही शिक्षण संस्था ग्रामीण भागाला मिळालेली संजीवनीच आहे.’ असे प्रतिपादन श्री दर्लिंग विद्यामंदिरचे आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्राप्त मारुती सदाशिव मिसाळ यांनी केले.



येथील स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी आपल्या भावना मनमोकळेपणाने मांडत होते. नुकताच त्यांना शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते मराठा सेवा संघ व डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, पंढरपूर यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मिळाला. चळे (ता. पंढरपूर) मधील श्री दर्लिंग विद्यामंदिरमध्ये गेल्या 27 वर्षापासून कार्यरत आहेत. मुळातच विद्यार्थी प्रिय असणारे मिसाळ यांचे चिरंजीव सचिन यांनी देखील स्वेरीतील इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरींगमधून तंत्रशिक्षण घेऊन अभियंता झाले.त्यानंतर ते कंपनीत रुजू झाले परंतु उच्च ध्येय बाळगणार्या सचिनने स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे व गुरुजनांच्या मार्गदर्शनानुसार आता एम.पी. एस. सी. स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. भविष्यकाळात सचिन अधिकारी होईल याचा आनंद देखील पुरस्कार प्राप्त त्याचे पिता मारुती मिसाळ यांच्या चेहर्यावरून स्पष्ट जाणवत होता. स्वेरीने आकाश टॅबलेटद्वारे पाच शाळांपैकी एक असलेल्या श्री दर्लिंग विद्यामंदीरमध्ये विद्यार्थ्यांना सुरवातीला वाय-फाय इंटरनेटद्वारे डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर स्वेरीच्याच संशोधन आणि विकास (आर. अँण्ड. डी.) अर्थात संशोधन विभागातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यासाठी टाकावू वस्तुपासून टिकावू करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे रोजगाराची संधी निर्माण झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गोडी स्वेरीमुळे वाढत आहे. यासाठी आम्हा ग्रामीण भागातील पालकांना व नागरिकांना स्वेरी’ पर्वणी ठरत आहे.’ अशा भावना पुरस्कार प्राप्त मिसाळ यांनी व्यक्त केल्या. मिसाळ यांना पुरस्कार मिळाल्याबद्धल सिव्हील इंजिनिअरींगचे विभाग प्रमुख डॉ. एन.व्ही.खडके यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, हनुमंत डोंगरे, विजय जगताप, संतोष हलकुडे उपस्थित होते.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे