👁 9 Views

सोलापूर जिल्ह्यात 44766 शेतक-यांना 227 कोटी 61 लाख रुपयांची कर्जमाफी

पंढरपूर Live 12 December 2017




सोलापूर जिल्ह्यात 44766 शेतक-यांना
227 कोटी 61 लाख रुपयांची कर्जमाफी
पंढरपूर Live 12 December 2017
सोलापूर दि 12 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र 44766 शेतक-यांना 227 कोटी 61 लाख 14553 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शेतकरी कर्जमाफी अंतर्गत 21758 शेतक-यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. 12882 शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. त्यापोटी 23 कोटी 70 लाख 25213 रुपये वितरित करण्यात आले आहेत. आज जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी ही माहिती दिली.
या योजनेतून राज्यात आत्तापर्यंत सुमारे 41 लाख शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. योजनेत राज्यात एकूण 77 लाख अर्ज प्राप्त झाले. छाननीत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. जे शेतकरी पात्र आहेत पण अर्ज केला नाही अशा शेतक-यांनाही या योजनेत सामावून घेणार. पात्र शेतक-यांना रक्कम मिळेपर्यंत योजना सुरु ठेवली जाणार आहे.
राज्य शासनाने शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहिर केली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च  2016 या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज दिनांक 30.06.2016 अखेर थकीत व 31 जुलै 2017 पर्यंत परतफेड न केलेल्या थकीत कर्जावर रूपये 1.50 लाखापर्यत माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे 1.50 लाखापेक्षा जास्त कर्ज थकीत असल्यास अशा शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड योजना लागू केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1.50 लाखावरील रक्कम भरणा केल्यास त्यांचे कर्ज खात्यावर शासनाकडून 1.50 लाख पर्यंत रक्कम भरणा केली जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी नियमित परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना लागू केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सन 2015-16 मध्ये कर्ज घेवून त्याची परतफेड दिनांक 30.06.2017 पर्यत केली आहे. तसेच सन 2016-17 मध्ये कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड दिनांक  31.07.2017 पर्यत केली असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेमध्ये त्यांनी परतफेड केलेल्या कर्जाच्या 25 टक्के पण किमान 15 हजार व जास्तीत जास्त रूपये 25 हजार एवढी रक्कम या शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर शासनातर्फे जमा केली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 14572 शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरले आहेत. त्यापैकी 12882       शेतक-यांच्या खात्यावर 23 कोटी 70 लाख 25213 रुपये जमा करण्यात आले आहेत. 21758 शेतक-यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या शेतक-यांनी संबंधित बँकेस संपर्क साधावा. या वन टाइम सेटलमेंटची 31 मार्च 2018 पर्यंत मुदत आहे. अशा शेतक-यांनी दीड लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफी मिळणार आहे, असे जिल्हा निबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले.
महाकर्जमाफीवर एक दृष्टीक्षेप
1)     सोलापूर‍ जिल्ह्यातील 44766 शेतक-यांना आता 227 कोटी 61 लाख 14553 रूपयांचा लाभ.
2)     जिल्ह्यातील 12882 शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान.
3)     त्यापोटी 23 कोटी 70 लाख 25213 रुपये वितरीत.
4)   21758 शेतक-यांना वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार.
5)    सोलापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा.

6)     सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत आत्तापर्यंत सुमारे 38088 शेतक-यांना एसएमएस.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *