👁 13 Views

देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने पंढरीतील मुकबधीर शाळेत शालेय साहित्याचे वाटप

पंढरपूर Live 14 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- देशाचे नेते व महिला आयोगाचे जनक व स्त्री प्रतिष्ठा जपणारे महिला हितवादी देशाचे नेते, राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीतील मुकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शरदचंद्रजी पवार यांना जनसेवेसाठी उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना करण्यात आली. ‘‘पवार साहेबांच्या विचारानुसार समाजसेवेचा वसा जपत आज आम्ही त्यांचा 77 वा वाढदिवस एक सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.’’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पंढरपूर शहराध्यक्षा सौ.रंजनाताई हजारे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
    
देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी आजपर्यंतच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजकारणात राजकारण आणले नाही. तळागाळीतील शोषीत व वंचीत समाजाची सेवा व उत्कर्ष हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राजकारण केले. आज वयाच्या 77 व्या वर्षीदेखील त्यांनी आपला वाढदिवस कोणताही डामडौल न करता साधेपणाने साजरा केला. एवढंच नव्हे तर वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी कोणतेही हार-तुरे न स्वीकारता राज्य व केंद्रातील भाजपा सरकारच्या निष्क्रीयेतेविरुध्द ‘हल्ला बोल’ आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. यातूनच त्यांच्या अंगी असणारा आपल्या रयतेविषयी, शेतकरी बांधवांविषयीचा कनवळा दिसून येतो. सर्वसामान्य माणसांच्या मनावर राज्य करणार्‍या या असामान्य जाणत्या राजाला जनसेवेसाठी उदंड आयुष्य लाभावे व ते देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी प्रार्थना यावेळी रंजनाताई हजारे यांनी केली.   
पंढरीतील मुकबधीर शाळेत वही, पेन आदी शालेय साहित्याचे वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ.रंजनाताई हजारे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य सुभाष भोसले, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे विधानसभा अध्यक्ष दिपक वाडदेकर, युवक शहराध्यक्ष संदिप मांडवे, शहराध्यक्ष सुधिर भोसले, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.अमिरजित गोडसे-पाटील, राष्ट्रवादी सेवादल जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपबापु भोसले, तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल गुलाब मुलाणी, कृष्णा माळी, संदिप मुटकुळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष ओबीसी सेल अनिल सप्ताळ, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा साधना राऊत, महिला तालुकाध्यक्षा अनिता पवार, युवती शहराध्यक्ष चारूशिला कुलकर्णी, महिला जिल्हा सचिव हेमलता पांढरभिसे, महिला शहर सचिव अर्चना शिंदे, पुष्पा आदमिले, सुवर्णा चव्हाण, ओबीसी महिला शहराध्यक्ष मनिषा शिंदे, महिला शहर उपाध्यक्ष जयश्रीराऊत, जयश्री वाघमारे आदी उपस्थित होते.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *