पंढरपूर Live 14 December 2017
निलेश चाळक बीड : केज व अंबाजोगाई तालुक्यांमध्ये महिलांना अडवून धाक दाखवत लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. अंबाजोगाई शहर व युसूफवडगाव ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील मनीषा दुर्गादास दामोशन (रा. विवेकानंद नगर या बुधवारी देवीच्या दर्शनाहून परत आल्या होत्या. विवेकानंदनगर पाटीजवळून पायी घराकडे परतताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून पोबारा केला. मनीषा दामोशन यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन गुन्हा नोंद झाला आहे. दुसरी घटना केज तालुक्यातील बनसारोळा रोडवर घडली. वैशाली नेताजी पुरी (रा. शिरपुरा) या पतीसोबत दुचाकीवरुन जात होत्या. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. नेताजी पुरी यांना मारहाण करत वैशाली यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने हिसकावून घेतले. याप्र्रकरणी युसफवडगाव ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








