👁 8 Views

ग्रामपंचायत निवडणुकी निमित्त मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

पंढरपूर Live 14 December 2017
ग्रामपंचायत निवडणुकी निमित्त
मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
सोलापूर दि. 14 :- जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतीसाठी दिनांक 26 डिसेंबर 2017 रोजी  मतदान आणि दिनांक 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक असणाऱ्या  ग्रामपंचायतीच्या ठिकाणी असलेल्या सर्व देशी व विदेशी  मद्यविक्री अनुज्ञप्त्या दिनांक 24 डिसेंबर 2017 रोजी सायं 5.30 पासून दिनांक 26 डिसेंबर 2017 रोजीच्या सायं 5.30 पर्यंत बंद ठेवाव्यात. तसेच दिनांक 27 डिसेंबर 2017 रोजी  ग्रामपंचायतीच्या मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या अनुज्ञाप्त्या पूर्ण दिवस बंद ठेवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. हे आदेश महाराष्ट्र मद्य विक्री निषेध अधिनियम मधील कलम 142 (1) अन्वये दिले आहेत.
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची नावे –
1)     पंढरपूर – ईश्वर पठाण
2)    माढा  – अंजनगांव खे, पिंपळखुटे, आढेगांव, वडशिंगे, अंबाड, लोणी / नाडी, मुंगशी ,कन्हेरगांव, तुळशी ,वडोली, चांदज, टेभुर्णी
3)     माळशिरस – माळीनगर , धर्मपुरी, कारूंडे, वाफेगाव
4)   मंगळवेढा – शिरसी ,अकोला, खडकी, जंगलगी, जुनोनी, खुपसंगी, महमदाबाद (हुन्नुर), बठाण, आंधळगांव, शेलेवाडी, उचेठाण, ब्रम्हपुरी, निंबोणी, जालीहाळ / सिध्दनकेरी, मुंढेवाडी, नंदूर, भाळवणी, चिकलगी , हिवरगाव
5)    दक्षिण सोलापूर – गावडेवाडी, शिरवळ, कासेगांव, कुसूर / खानापूर, दोड्डी, वळसंग
6)    अक्कलकोट – दहिटणे, हसापूर, जेऊरवाडी
7)   बार्शी – उंडेगाव, मुंगशी (वा), अंबाबाईची वाडी
8)    सांगोला – खवासपूर, सावे, चिकमहूद / बंडगरवाडी
9)      करमाळा – राजूरी , भगतवाडी / गुलमरवाडी, जेऊर, गौंडरे, उंदरगाव, कोटी / हुलगेवाडी, चिखलठाण, कंदर, निंभोरे, वीट, केत्तूर, रामवाडी, घोटी .
*****
मतदाना दिवशी
स्थानिक सुट्टी
सोलापूर दि. 14 :- जानेवारी व फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून या ग्रामपंचायतीसाठी 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.
संबंधित ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांना मतदान कराता यावे म्हणून निवडणूक असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *