👁 8 Views

अपघातात एक ठार :पिंपळगाव फाट्याजवळील घटना

पंढरपूर Live 15 December 2017
निलेश चाळक बीड -उमापुरकडून चौसाळा येथे दुचाकीवरून जात असलेल्या एका २५ वर्षीय तरूणास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गेवराई -शेवगाव मार्गावरील बोरी-पिंपळगाव फाट्याजवळ घडला.
शहादेवला सुदाम सुरवसे (वय २५ रा.उमापुर) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो दुचाकीवरुन (क्र.एमएच २३ ए ९८८५) वरून जात असताना गेवराई-शेवगाव राज्य मार्गावरील बोरी-पिंपळगाव फाट्याजवळअज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. उमापुर येथील मधुकर आहेर यांनी हा प्रकार पाहिला असता त्यांनी शहादेवला उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
दरम्यान, आज सकाळी गेवराई पोलिसांनी पंचनामा करून येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार अमोल मालुसरे करत आहेत






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *