👁 7 Views

आ.क्षीरसागरांची नॅशनल हायवेच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक… आजपासूनच नव्या पुलाचे काम सुरू होणार!

पंढरपूर Live 15 December 2017
 निलेश चाळक बीड- शहरातील बिंदूसरा नदीवरील पुलाचे काम आता तातडीने म्हणजेच आजपासूनच सुरू होणार आहे. गुरूवारी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी नॅशनल हायवेचे अधिकारी एस.चंद्रशेखर, आय.आर.बी.चे वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकार्‍यांची तातडीने नागपूर येथे बैठक आयोजीत केली होती.* आय.आर.बी. करत असलेल्या नॅशलन हायवे 211 च्या कामांतर्गत स्कोप ऑफ चेंज वर्क या हेडखाली हे काम होणार असून असलेला पूल पाडण्याचे काम 15-20 दिवसात करून पावसाळयापुर्वीच नव्या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सुचना आ.क्षीरसागरांनी दिल्यामुळे या पुलाचा प्रश्‍न आता मार्गी लागला आहे.
धुळे-सोलापूर नॅशनल हायवे 211 वरील बीड बायपास 12 किलोमीटरला सर्विस रोड व स्लीप रोड करून परळी बीड नगर रस्त्यावर पांगरबावडी, इमामपूर या ठिकाणी भुयारी पूल व रस्ता करण्याचा निर्णय झाल्यानंतर कुर्ला रोडवरील नागरीकांसाठी सर्विस रोड व स्लीपरोड करण्याची सुचनाही आ.जयदत्त क्षीरसागर यांनी प्रकल्प संचालक यांना दिली* होती. त्याच वेळी नॅशनल हायवे 211 वरील बार्शी नाका येथील बिंदूसरा नदीवरील 80 वर्षापुर्वीचा पूल पाडून त्याच ठिकाणी नवीन पूल 162 मीटर लांबीचा करण्याचा प्रस्ताव 2016 मध्येच दाखल केला होता. या कामासाठी आ.क्षीरसागर यांनी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा पूल स्कोप ऑफ चेंज वर्क या नियमानुसार नवीन टेंडर न काढता कमी कालावधीत करता येतो हे निदर्शनास आणून दिले होते त्यानंतर ना.गडकरी यांनी स्कोप ऑफ चेंज वर्क या निमानुसार पुलाच्या बांधकामाबाबत सुचना देऊन तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आ.जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य संचालक एस.चंद्रशेखर आणि प्रकल्प संचालक चामलगोरे, घोटकर, आय.आर.बी.कंपनीचे प्रकल्प संचालक आर.एन.चौरे, धनराज केपरीट, कार्यकारी अभियंता दंडे राष्ट्रीय महामार्ग यांच्याबरोबर बैठका घेऊन पुलाच्या कामाला गती दिली. आज गुरूवारी नागपूर येथे मुख्य संचालक एस.चंद्रशेखर व आय.आर.बी.च्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन पुल पाडण्याचे काम आज शुक्रवार पासूनच सुरू होणार असून पावसाळयापुर्वीच नवीन पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सुचना आ.क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून संबंधीत अधिकार्‍यांच्या साधारण 6 ते 7 वेळा बैठका घेऊन अखेर या पुलाचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. आज मुख्य संचालक एस.चंद्रशेखर व त्यांच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जुना पूल पाडण्याचे काम सुरू होणार आहे. आ.क्षीरसागर हे अधिवेशन असल्यामुळे नागपूर येथे आहेत त्यामुळे आज ते येऊ शकणार नाहीत. 






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *