पंढरपूर Live 16 December 2017
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस(आय)च्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज राहूल गांधीनी या पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पंढरीतील कॉग्रेस(आय)च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.कॉंग्रेसमध्ये आजपासून ’राहुलपर्व’ सुरू झालंय. 132 वर्षांची परंपरा असलेल्या कॉंग्रेस पक्षाला आज 47 वर्षीय राहुल गांधी यांच्या रूपानं नवं नेतृत्व मिळाले आहे. पक्षाच्या मुख्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
यावेळी पंढरपूर तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील,पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटीचे मा.अध्यक्ष सुहास भाळवणकर,पंढरपूर शहर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अश्पाक सय्यद,कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे,ज्येष्ठ नेते प्रतापसिंह रजपूत,पंढरपूर शहर कॉग्रेसचे उपाध्यक्ष नागनाथ अधटराव,पंढरपूर तालुका युवककॉग्रेसचे अध्यक्ष नितिन नागणे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणचे संस्थापक डि.राज सर्वगोड,पंढरपूर शहर युवक कॉग्रेसचे अध्यक्ष शंकर सुुरवसे,पंढरपूर शहर युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष अभिषेक शहा,शकील आतार,देवानंद इरकल,दत्ता झरकर,सुरज कुकडे,आनंद भागानगरे,विशाल पवार,सत्यम धुुमाळ,विक्रांत बोडके,अक्षय साबळे यांच्यासह कॉग्रेस(आय)चे कार्यकर्ते उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







