पंढरपूर Live 16 December 2017
पंढरपूर प्रतिनिधी
शेळवे (ता. पंढरपूर) येथील युवा ग्रामीण साहित्यिक अंकुश गाजरे यांना मनोरमा परिवार सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा 2017 चा मनोरमा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार गाजरे यांच्या “गावमातीतली माणसं” या व्यक्तिचित्र संग्रहास जाहीर झाला आहे.रोख रक्कम 5 हजार रुपये ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.हा पुरस्कार माजी केंद्रीय ग्रहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,जेष्ठ लेखक डॉ.द.ता.भोसले यांचे शुभहस्ते दिनांक 25 रोजी रंगभवन सभागृह ,सोलापूर येथे गाजरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.अंकुश गाजरे यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल लेखक अंकुश गाजरे यांचे साहित्य क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






