पंढरपूर Live 16 December 2017
राष्ट्रीय सेवा योजनेचा हा उपक्रम
आठवडाभर चालणार
पंढरपूर- सोलापूर विद्यापीठ सोलापूर व स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक १२डिसेंबर पासून सुरु झालेली ही रासेयोची मोहीम १८ डिसेंबरपर्यंत चालणार असल्याचे रासेयो कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डी.जे यादव यांनी सांगितले.
याउपक्रमामध्ये विशेष परिश्रम, ग्रामस्थांना शैक्षणिक प्रबोधन , ग्राम स्वच्छतेचे महत्व, मुली वाचवा देश वाचवा, वृक्षारोपण, पाणी वाचवा, जिल्हा परिषदेतील लहान मुलांना शिक्षणाचे महत्व व मार्गदर्शन असे अनेक प्रबोधनपर व संस्कारात्मक स्वरूपाचे शिबीर तावशी (ता.पंढरपुर) येथे आयोजित केले आहे. या शिबिराचे उदघाटन स्वेरीचे संस्थापक सचिव डाँ बी.पी .रोंगे यांच्या हस्तेझाले. यावेळी विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तावशी गावाच्या सरपंच सौ सोनाली गणपत यादव, उपसरपंच सौ. संजिवनी महादेव सातपुते,वि.का.से. सो.चे चेअरमन सरकार यादव, भुजंग यादव, मिलिंद यादव, ग्रामविकास अधिकारी श्रीमती ज्योती पाटील, साधना विद्यालयाचे सचिव बाळूकाका यादव, पुरुषोत्तम पवार- पाटील, धनाजी वसंत यादव,साधना विद्यालयाचे मुख्याध्यापक अनुसे,स्वेरी फार्मसीचे प्रभारी प्राचार्य प्रा.पी. बी. गुरव, स्वेरी फार्मसीचे प्रा. व्ही. व्ही. मोरे ,प्रा.एम. डी. मिटकल, संदीप यादव, रा.से.यो.चे विद्यार्थी प्रतिनिधी हर्षद माने याच्यासह इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम करून ग्रामस्थांना व मार्गदर्शन केले. स्वेरी फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट गेल्या फार्मसीच्या स्थापनेपासून नागरिकांना स्वेच्छतेतूनसमृद्धीकडे घेवून जाताना समाजसेवेचे काम अविरत करत आहेत.
‘माझ्यासाठी नव्हे,तुमच्यासाठी’ या रा.से.यो.च्या ब्रीद वाक्याप्रमाणे तावशी गावातील जय मल्हार मंदीर परिसर स्वछ करण्यात आला. तब्बल आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात स्वछतेबरोबरच विविध सामाजिकउपक्रम देखील राबवण्यात येत आहेत. याचा समारोप येत्या सोमवारी (१८ डिसेंबर) होईल. दरम्यान विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था तावशी ग्रामपंचायती तर्फे खंडोबा मंदिरात करण्यात आली असून बी. फार्मसीचे जवळपास ५० विद्यार्थ्यांच्या आगमनाने तावशी गावातील नागरिक आनंदून गेले असून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
छायाचित्र- तावशी ग्राम स्वच्छता करताना स्वेरी फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







