पंढरपूर Live 16 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे मुख्य निवडणुक आयुक्क्त जे. एस. सहारिया हे आज पंढरपूरच्या दौर्यावर आलेले असताना त्यांना पंढरपूरमधील गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात माहिती देऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी आता आपणच पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
पंढरपूरमध्ये अनेक वर्षापासून रस्त्यांची कामे रखडल्यामुळे व जी कांही कामे झाली ती निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे पांडुरंगाची या नगरीत सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले आढळते. धुळीमुळे अनेक नागरिकांना फुप्फुसाचे, श्वसनाचे विकार व नेत्रविकार असे आजार जडलेले आहेत. नमामी चंद्रभागा ही योजना फक्त कागदावरच आहे. मोठा गाजावाजा करुन शासनाने आणलेली या योजनेद्वारे चंद्रभागेचे पावित्र्य राखले जाईल असे काहीही घडलेले नाही. आजही चंद्रभागेत मैलामिश्रीत पाणी मिसळत असते. या पाण्यासंदर्भात माहितीही त्यांना दिली.
चंद्रभागेच्या पात्रात होणारा अवैध वाळु उपसा, नदीपात्रात धुतली जाणारी वाहने, जनावरे, नदीच्या पाण्यात होणारे निर्माल्य विसर्जन आदींमुळे चंद्रभागेचे प्रचंड प्रदुषण वाढलेले आहे. यामुळे चंद्रभागेचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. ही गंभीर बाब असून याकडे आपण स्वत: लक्ष घालून स्थानिक प्रशासनाला याबाबत योग्य त्या सुचना द्याव्यात. अशी विनंती केली.
ज्या लोकांची नांवे आपल्या गावी सुध्दा मतदार यादीत आहेत अशा बाहेरगावच्या अनेकांची नांव पंढरपूर शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या मतदार यादीतही आहेत. कांही ठराविक प्रभागात नगरपरिषद निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे हजारांच्या संख्येने बोगस मतदान झाले आहे. ही बाब लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. याबाबतही गणेश अंकुशराव यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणुक आयुक्क्त जे. एस. सहारिया यांना माहिती दिली. याबाबत आपण माझ्याशी लेखी पत्रव्यवहार करा! यात दोषी असणारांवर कडक कारवाई करु. असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी तहसिलदार मधुसुदन बर्गे, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे आदींसह अनेक अधिकारी व पुंडलिक परचंडे, गणेश तारापूरकर, महावीर अभंगराव चंद्रकांत अभंगराव, अमर परचंडे, नरेश कोताळकर, अप्पा करकमकर उपस्थित झाले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







