👁 6 Views

चिक्की प्रकरणात पालकमंञी पकंजा मुंडेना क्लिन चिट


पंढरपूर Live 17 December 2017
निलेश चाळक बीड : बालकांसाठी खरेदी केलेल्या खाद्यपदार्थाच्या खरेदी प्रकरणात कसलाही भ्रष्टाचार आणि अनियमितता आढळून आली नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा  मुंडे यांना क्लिन चीट दिली आहे. या प्रकरणावरून  पंकजा मुंडेंना टार्गेट करणारे विरोधक पुन्हा एकदा चांगलेच तोंडावर आपटले आहेत. 
 राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि काॅग्रेस नेते सचिन सावंत यांनी यांनी याप्रकरणी  मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. धनंजय मुंडे यांनी बुधवारी जेंव्हा विधान परिषदेत या प्रकरणाच्या चौकशीच्या स्थिती बाबत विचारणा केली तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी एसीबीने अहवाल सादर केल्याचे सांगत याप्रकरणी शासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे सांगितले होते.   मुंडे यांच्या सूचनेनुसार १३ फेब्रुवारी २०१५ रोजी सिंधुदुर्ग सहकारी संस्थेला १२३ कोटी रुपयांच्या चिक्की पुरवठ्याचा आदेश देण्यात आला होता, आणि संबंधित संस्थेने निकृष्ट दर्जाच्या मालाचा पुरवठा केला होता. परंतु या सर्व प्रकारात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही अथवा त्यात अनियमितता आढळून आली नसल्याचे एसीबीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. 
धनंजय मुंडे, सावंत तोंडघशी

चिक्की खरेदी प्रकरणावरून   पंकजा  मुंडे यांना सातत्याने अडचणीत आणणारे आणि सभागृहात मोठा गहजब करणारे  धनंजय मुंडे आणि सचिन सावंत एसीबीच्या या अहवालाने पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत. केवळ राजकीय द्वेषापोटी  पंकजा  मुंडे यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *