👁 10 Views

खा. अमर साबळेंचे शनिवारी‘सुशासन’ विषयावर व्याख्यान

पंढरपूर Live 21 December 2017
खा. अमर साबळेंचे शनिवारी‘सुशासन’ विषयावर व्याख्यान
पंढरपूर (प्रतिनिधी) : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खा. अमर साबळे यांचे केंद्र व राज्य सरकारमधील कारभारावरील ‘सुशासन’ या विषयावर पंढरपुरात व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर ग्रामीण भाजपाचे संघटन सरचिटणीस राजकुमार पाटील भूषविणार आहेत.
शनिवार दि. 23 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 5 वाजता श्री विठ्ठल मंदिराजवळील श्रीसंत तुकाराम भवन येथे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य लोकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत.
केंद्र व राज्यातील सरकारच्या या लोकाभिमुख योजना, सर्वसामान्यांसाठी सरकार करत असलेली विविध कामे आणि प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या सोडविल्या जाणार्‍या अडीअडचणी या सर्व बाबींचा उहापोह संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य खा. अमर साबळे आपल्या व्याख्यानातून विषद करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर पंचक्रोशीतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष अपर्णा तारके, युवा मोर्चाचे अध्यक्ष विदुल अधटराव व युवती आघाडी प्रमुख देवयानी दामोदरे  यांनी केले आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *