पंढरपूर Live 21 December 2017
स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनसाठी
7 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत
सोलापूर दि. 21 :- स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन योजनेचे पुनर्विलोकन करण्यात आले असून पात्र स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्ती वेतनासाठी दिनांक 7 जानेवारी 2018 पर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेनुसार जे स्वातंत्र्य सैनिक दिनांक 4 जुलै 1995 आणि 18 एप्रिल 2015 मधील शासन निर्णयात दिलेल्या निकषांची पूर्तता करत आहेत त्यांनी निवृत्ती वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे 7 जानेवारी 2018 पर्यंत अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी कळविले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




