पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 30 December 2017
मुख्यमंत्री पेयजल योजनेतून
राज्यात 2 हजार 500 कोटींची कामे
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन
सोलापूर दि.30 :- राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेशे आणि शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेतून राज्यात सुमारे 2 हजार 500 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मंद्रुप येथे दिली.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंद्रुप (जि. सोलापूर) नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन श्री. लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंद्रुप येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित होते.
श्री. लोणीकर म्हणाले, राज्यातील सामान्य जनतेचे हित लक्षात घेवूनच सामान्यांच्या विकासाच्या योजना राज्यात राबविण्यावर शासनाने भर दिला आहे. त्यापैकीच मुख्यमंत्री ग्राम पेयजल कार्यक्रम आहे. जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क असून यासाठी शासनामार्फत पाणी पुरवठा योजनांमध्ये भरीव काम करण्यात येत आहे. यासाठी मुबलक निधीही उपलब्ध करुन दिला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अपूर्ण पाणी पुरवठा योजनांसाठी सुमारे 311 कोटींचा निधी दिला असून मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमास जिल्ह्यात 28 कोटी निधी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. योजनेचे काम मुदतीत पूर्ण करुन गावकऱ्यांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
स्वच्छता अभियान देशात महाराष्ट्राचे काम उत्कृष्ठ असून राज्य या कामात कायम अग्रेसर असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री लोणीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील 15 जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत. 204 तालुके, 22000 ग्रामपंचायती व 32000 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. राज्यात सुमारे 50 लाख शौचालयाची बांधकामे पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले. स्वच्छता अभियानात प्रत्येकाने सहभाग घ्यावा, असे आवाहनही स्वच्छता मंत्री यांनी केले.
सहकार मंत्री देशमुख म्हणलो, मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमातून मंद्रुप पाणी पुरवठा योजना होत असल्याने मंद्रुपकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ही योजना मुदतीत व दर्जेदार व्हावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. तालुक्यात विकास कामांची गती वाढत आहे. हे या योजनेच्या कामामुळे दिसून येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याचा सर्वांगीन विकास करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यात नवीन एमआयडीसी करण्याचा मानस आहे. एमआयडीसीमुळे तालुक्यातील बेरोजगार युवकांना काम मिळणार असून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. तालुक्यातील युवकांनी मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वयंरोजगारात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सहकार मंत्री म्हणाले, मंद्रुप येथे अतीरिक्त तहसिल कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याने त्यामुळे या परिसरातील लोकांची सोय होणार आहे. शेती आणि शेतकरी सक्षम व्हावा यासाठी शासन शेतीमध्ये अनेक नवीन योजना राबवित आहे. जलयुक्त शिवार, शेततळे, ठिबक यासारख्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. भविष्यात क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमही राबविण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री श्री. देशमुख म्हणाले.
कार्यक्रमास पंचायत समितीचे उपसभापती संदीप टेळे, सरपंच विश्वनाथ हिरेमठ, शहाजी पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
*****
पाणी पुरवठा योजना सोलारवर आणण्याचे धोरण आणणार
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन
सोलापूर दि.30 :- जनतेस पिण्याचे स्वच्छ, शुध्द आणि पुरेसे पाणी मिळावेत, यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या काही योजना वीज बिलाअभावी बंद पडतात. वीजेमुळे योजना बंद होऊ नयेत, नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावेत यासाठी पाणी पुरवठा योजना सोलारवर आणण्याचे धोरण राज्य शासनामार्फत आणणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषद येथे आयोजित आढावा बैठकीत दिली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक पाणी पुरवठा मंत्री श्री. लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, शहाजी पवार, सदस्य उमेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
पाणी पुरवठा मंत्री श्री. लोणीकर म्हणाले, जनतेस शुध्द पाणी मिळावे हा त्यांचा हक्क आहे, यासाठी राज्य शासन अनेक पाणी पुरवठ्याच्या अनेक योजनावर निधी खर्च करुन या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ वीज बिला अभावी योजना बंद पडू नयेत यासाठी राज्यातील पन्नास टक्के योजना सोलारवर आणण्यासाठी धोरण आखण्याचा मानस आहे. असे धोरण तयार झाल्यानंतर योजना पूर्ण क्षमतेने सुरु होऊन लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी गेल्या तीन वर्षात सुमारे 311 कोटीचा निधी देण्यात आला आहे. या योजनांची कामे गतीने दर्जेदार व मुदतीत पूर्ण करावीत, अशा सूचना पाणी पुरवठा मंत्री श्री. लोणीकर यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यात गेल्या तीन वर्षात 5 हजार 500 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील गावांचा समावेश होण्यासाठी जिल्हा परिषदेने येत्या आठ दिवसात प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी आढावा बैठकीत दिल्या.
श्री. लोणीकर म्हणाले, स्वच्छतेच्या कामात राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यापूढेही या कामात असेच सातत्य राखण्यासाठी काम व्हावे, स्वच्छतेसाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रबोधन करणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यात स्वच्छतेचे भरीव काम झाले असून या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात राज्यातील उर्वरित जिल्हेही हागणदारीमुक्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांनी पाणी पुरवठा योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पेयजल योजनेत जिल्ह्यात मंजूर झालेल्या 11 गावातील पाणी पुरवठा योजनांचे ई भूमीपूजन व पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



