पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 30 December 2017
स्वेरीत बीट्स २०१७ चे थाटात उदघाटन
पंढरपूर- ‘अभियांत्रिकी मधील आय. टी. पदवी घेतली. पुढे इंन्फोसिस कंपनीमध्ये निवड झाली होती परंतु त्या वेळेस आय. पी.एस. होण्याचे मनोमन ठरविले आणि त्या ध्येयानुसार कठोर परिश्रम सुरु केले आणि माझ्या प्रयत्नांना फळ मिळाले आणि इच्छित ध्येय गाठू शकलो. मित्रांनो, सांगायचेय की कोणतेही काम सहज सोपे नसते. त्यासाठी आपला कोणत्याही प्रसंगी आत्मविस्वास ढळू न देता ‘कठोर परिश्रमा’बरोबरच’स्मार्ट वर्क’ केले तर कोणतेही अवघड काम सहज साध्य होते.’ असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालय या पदवी विभागातील विद्यार्थ्याच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या बीट्स २०१७ अर्थात कलागुणांचा अविष्कार असलेला रंगमंच मिळाला. या स्नेहसंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहा. पोलीस अधिक्षक पिंगळे विद्यार्थ्यांचे ‘स्पर्धा परीक्षेत असलेली आव्हाने’ यावर मार्गदर्शन करत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पुण्यातीलइन्फोसिस कंपनीमध्ये प्रिन्सिपल कन्सल्टंट पदावर असेलेले स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिरिंगच्या पहील्या बॅचचे विद्यार्थी सचिन बोर्डे म्हणाले की, ‘कोणतेही काम लहान नसून ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावीच लागती स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे सरांनी त्यावेळी घालून दिलेल्या ‘हार्ड वर्क’च्या सवयीमुळे मला अशक्य काहीच जाणवले नाही आणि अवघड कार्य देखील सहज होऊ लागले. ज्यांचे स्वप्न भक्कम आहेत त्यांनी त्याचा पाठपुरावा करून यशाचे ध्येय गाठावे.’असे आवाहन केले. पुढे बोलताना सहा. पोलीस अधिक्षक पिंगळे म्हणाले की, ‘आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपला आत्मविश्वास कमी होऊ देवू नका. पुढील आयुष्याचे नियोजन या वयातच करून ठेवा, बदलत्या काळातील आव्हाने स्वीकारून त्याचा पाठपुरावा करा. त्यासाठी अथक प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट साध्य करणे अशक्य नाही. आज माझी आई ज्या पदावर आहे त्याच पदावर मी आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. महिला सर्वत्र आघाडीवर असताना आपण देखील समाजात वावरताना प्रथमतः महिलांचा आदर करा.’असे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
प्रारंभी स्वाती नांगरे यांच्या गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण उत्तमरीत्या केले. एकीकडे उशिरापर्यंत सुरु असलेली प्रवेश प्रक्रीया तर दुसरीकडे अभ्यासासाठी मिळणारा कमी कालावधी यातून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कमी अवधी मिळाला होता. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने केले. सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांची मुक्त उधळण केली गेली. त्यात हिंदी-मराठी भाषेतील नव्या व जुन्या गाण्यांचा समावेश देखील होता.अगदी सूत्रसंचालनापासून ते विविध नाट्यछटा सादर करेपर्यंत संस्थेच्या नियमितच्या शिस्तीला कोणतीही बाधा न आणता विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेख कलाविष्कार सादर केले.त्यात नेत्रदीपक विद्युत रोशणाई, कर्णमधुर संगीत यांचा मिलाप देखील पहायला मिळाला. यावेळी नेमबाजीमध्ये उत्तुंग यश मिळविलेली द.ह.कवठेकर प्रशालेतील विद्यार्थिनी स्नेहल शिंदे हीचा गौरव करण्यात आला.
यावेळी. केंद्रीय बांधकाम विभागात असलेले स्वेरीचे माजी विद्यार्थी वैभव क्षीरसागर, उच्च पद्स्त असलेले माजी विद्यार्थी संदीप टीकारे, गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजी आसबे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, माजी अध्यक्ष व विश्वस्त डी.एस. सालविठ्ठल, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, रणदिवे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी यांच्यासह इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



