👁 4 Views

पत्नीची हत्या करून प्रेत जाळले

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 31 December 2017

निलेश चाळक बीड : चारित्र्यावर संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या करत प्रेत जाळल्याची घटना शनिवारी हिवरा येथे उघडकीस आली. सुटीवर आलेल्या जवानाने केलेल्या या कृत्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. गीतांजली शरद लगड (२८) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
 हिवरा येथील  शरद उर्फ दत्तू  लगड हा भारतीय सैन्य दलात जवान आहे. तो गेल्या आठवड्यात सुटीवर गावी आला आहे.  पत्नीच्या चारिञ्यावर त्याचा संशय होता. शुक्रवारी शेतात कामाच्या निमित्ताने तो पत्नी गीतांजली सोबत गेला. तेथे पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले.  यावेळी शरद लगड याने पत्नी गीतांजलीचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शरदने कापसाच्या सरपणाच्या ढिगा-यावर गीतांजलीचा मृतदेह ठेवून काडी ओढली. संपूर्ण मृतदेह जळून खाक झाला.  याप्रकरणी अंभोरा पोलिसांत संपत विठ्ल निमसे यांच्या फिर्यादीवरून शरद लगड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपी शरद उर्फ दत्तु लगड यास अटक केली असून  तपास उपअधीक्षक डॉ.अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  निरीक्षक मिर्झा बेग हे करीत आहेत.
आरोपी स्वतःहून पोलिसांत 
पत्नीची हत्या केल्यानंतर शरद लगड शेतात एकटाच होता. मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्यावर त्याने शेतातच रात्र काढली. इकडे त्याच्या कुटुंबीयांनी शरद व गीतांजली घरी न आल्याने शोध घेतला तेंव्हा ही घटना समोर आली. दरम्यान सकाळी ८ वाजता जवान शरद लगड स्वतःहून अंभोरा ठाण्यात हजार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेची कारवाई पूर्ण करत गुन्हाही नोंद करून घेतला.

=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *