👁 5 Views

शहीद कुणाल गोसावी अंधशाळेचे भाडे कायमचे माफ करा- समीर कोळी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर LIVE 5 जानेवारी 2018


जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी. विभागाची मागणी




विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूर नगरीत महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर एक तीर्थक्षेत्र म्हणून पंढरीनगरी सुप्रसिद्ध आहे. तर शंभरीपूर्ण केलेल्या पंढरपूर नगरपरिषदेच्या भाविकांची सेवा करणारी नगरपरिषद म्हणून लौकिक आहे. वेळोवेळी महाराष्ट्र शासनाकडून नगरपरिषदेचा सन्मान ही झाला आहे. अशा पुण्यपंढरीचा एक शूर सुपूत्र मेजर कुणाल गोसावी जम्मूच्या नगरोटा भागात लढताना शहीद झाला. देशाने त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर केले आहे. आज भाविकांची पंढरी या ओळखी बरोबरच शहीद गोसावींची पंढरी अशी एक नवी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याच्या ऋणात राहण्यासाठी विविध संस्था आपापल्या परीने अनेक लोकउपयोगी उपक्रम राबविण्यास सुरवात केली यापैकी पंढरपूर लायंन्स क्लब संचालित शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी या नावाने निवासी अंधशाळा चालविली जाते. या शाळेसाठी नगरपालिका मालकीची इमारत हनूमान मैदान येथे सहा खोल्या असून या करीता एक लाख दोन हजार रुपये नगरपरिषदेला द्यावे लागतात. शहीद मेजर कुणाल गोसावींसह देशातील सर्व शहीदांच्या देशवासीय ऋणात रहात आलेले आहेत. मग पंढरी याला अपवाद कशी असणार. पंढरीच्या जनतेची असणारी सार्वजनिक मालमत्ता हनूमान मैदान येथील बांधकामाच्या सहा खोल्यांचे वार्षिक भाडे कायमचे माफ करुन पंढरीच्या शहीद सुपूत्राला पंढरीच्या जनतेची श्रध्दांजली अर्पण होण्याची ही संधी नगरपरिषदेने मिळवून द्यावी . अशी मागणी जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी. कडून  निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना  करण्यात आली.   
 भाडे माफ नाही झाले नाही तर काँग्रेस ओ.बी.सी.विभाग , सर्व काॅग्रेस पदाधिकारी  व कार्यकर्त्यां कडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 
 मुख्याधिकारी यांना  निवेदन देतेवेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी. विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी , जेष्ठ नेते मामा फलटणकर , जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमर सुर्यवंशी , नगरसेवक अनिल अभंगराव, सभागृह नेते अभ्यंकर , शकुंतला नडगीरे, आशाताई बागल, राजश्री लोळगे , प्रा. अशोक डोळ, समाधान रोकडे, प्रा. मारूती भोसले, शिवाजी धोत्रे , महेश जाधव, संदीप मुटकूळे , सोमेश्वर अभंगराव, बाळासाहेब आसबे उपस्थित होते.


___________________________

  आपल्या बातम्या लेख/साहित्य – माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा…

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

=====================

15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *