👁 9 Views

सुर्यनारायण देवाचा जयघोष,टाळमृदंगाचा निनाद आणि भाविकांच्या उत्साहात पालखी सोहळा संपन्न


पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
सुर्यनारायण देवाचा जयघोष,टाळमृदंगाचा निनाद आणि 
भाविकांच्या उत्साहात पालखी सोहळा संपन्न 
* नारायण चिंचोली येथे भाविकांची अलोट गर्दी* 
सुर्यनारायण देवाचा जयघोष,टाळमृदंगाचा निनाद आणि भाविकांची प्रचंड गर्दी या भक्तीपुर्ण वातावरणात  नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथे सुर्यनारायण देव यात्रेचा मुख्य दिवस असलेल्या तिसर्‍या रविवारी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला.या पालखी सोहळ्या निमित्त सुर्यनारायणाचा महाअभिषेक करुन पालखीमध्ये पादुका ठेवून पादुका पुजन व आरती पुजारी गणेश अवताडे यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर पालखी परिक्रमेस सुुरुवात झाली.गावातील सर्व प्रमुख रस्त्यावरुन मार्गस्थ होताना ग्रामस्थांच्या वतीने पालखीवर पुष्पवर्षावर करण्यात आला.
       या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नारायण चिंचोलीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांबरोबरच राज्यभरातून आलेले भाविक सहभागी झाले होते.पालखीच्या स्वागतासाठी नारायण चिंचोली येथील माताभगिणींनी सडारांगोळी करुन पालखीच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.या पालखी सोहळ्यात शेकडोच्या संख्येने भाविक महिला डोक्यावर तिर्थकलश घेवून सहभागी झालेल्या होत्या.तर ढोल ताशाचा गजर करीत तरुणांनीही आपली सेवा बजावली.या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या बालवारकर्‍यांची दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.तर ह.भ.प.मिनाताई बिडकर यांनी अतिशय सुश्राव्य किर्तन सेवा बजावली.
     या पालखी सोहळ्यासाठी बाहेरुन आलेल्या प्रमुख भाविक मान्यवरांचा देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे,सरपंच अलका विठ्ठल माने,ट्रस्टचे अध्यक्ष गहिनीनाथ चव्हाण,उपाध्यक्ष विजय कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.हा पालखी सोहळा आनंदात पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मोलाचे परिश्रम घेतले.या पालखी सोहळ्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे     
 बिट हवालदार श्री क्षिरसागर,श्री इंगोले,यजगर आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 
 
चौकट:- पालखी सोहळ्यानिमित्त प्रमुख मान्यवरांनी घेतले सुर्यनारायणाचे दर्शन
  या यात्रेनिमित्त रविवार दिनांक 7 रोजी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहीते-पाटील,जि.प.समाजकल्याण समितीचे मा.सभापती शिवाजी कांबळे,बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,जि.प.सदस्य सुभाष माने आदींनी दर्शन घेतले.  

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *