सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला तालुका शिक्षण संस्थाचालक संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा रविवार 7 जानेवारी रोजी संपन्न झाली. सदर कार्यकारी संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर संघाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा असे ठरले.
या संघामार्फत आदर्श संस्थाचालक पुरस्कार देण्यात यावे असे संघाच्या दुसऱ्या वर्धापन दिनी द्यावे असे सर्वानुमते ठरले. सदर पुरस्कारासाठी पाच सदस्यांची समिती नेण्यात आली असून ती लवकराच तालुक्यातील गटानुसार आदर्श संस्थाचालकाची निवड करतील.
तसेच संस्था चालवत असताना शासनाकडून शासकीय अधिकाऱ्याकडून किंवा काही संघटनाकडून नाहक त्रास असल्यास सदर संघ संचालक किंवा इतर कोणाकडूनही नाहक त्रास होत असल्यास संस्थाचालक शाळा चालवत असताना त्रास होत असल्यास सांगोला तालुका शिक्षण संस्थाचालक संघ हा त्या संस्थापक चालकाच्या पाठीशी उभा राहील असे संस्थाचालकाच्या कार्यकारी मंडळामध्ये एकमताने ठराव करण्यात आला.
सदर मिटींगसाठी संघाचे अध्यक्ष ऍड.रमेश येडगे, उपाध्यक्ष गुलाब बाबर, खजिनदार लऊळकर, सदस्य नवनाथ भोसले, ज्ञानेश्वर कोळसे-पाटील, अनीता चव्हाण सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. या सभेचे आभार डॉ. अनिल कांबळे व निलकंठ शिंदे यांनी मानले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com



