👁 8 Views

पंढरीत पांचाळ सोनार समाजाचा राज्यव्यापी वधु-वर परिचय मेळावा संपन्न

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018

   पांचाळ सोनार समाज बांंधव व केशव चंद्रकांत महामुनी यांनी आयोजीत केलेला पांचाळ सोनार समाजाचा राज्यव्यापी वधु-वर परिचय मेळावा येथील देवनारायणबाबा भक्त निवास जुना अकलूज रस्ता येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याचे उदघाटन कार्यक्रमाचे मा.सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तर अध्यक्षस्थान सुधाकर वेदपाठक(लातूर) यांनी भुषवीले.या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून दादा  दिक्षीत(ईट),अंगद वेदपाठक(ईट),राजेंद्र पारखे(कुर्डुवाडी) हे उपस्थित होते.
        पांचाळ सोनार समाज राज्यभर विखुरलेला असून समाजबांधवांचा एकत्र येवून   विचारांची देवाण घेवाण व्हावी व वधु-वरांचा तसेच पालकांचा परिचय व्हावा,त्याच बरोबर सुलभ संपर्क होऊन अर्थिक व वेळेचा अपव्यय टाळला जावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती संयोजक केशव चंद्रकांत महामुनी यांनी दिली आहे.
    या मेळाव्याचे उदघाटक मा.आ.हर्षवर्धन पाटील यांनी आयोजकांच्य उपक्रमाचे कौतुक करीत अशा मेळाव्यांच्या माध्यमातून समाजबांधवांचा संपर्क होतो.नव्या पिढीकडे खुप ज्ञान आहे मात्र वेळेचा अभाव आहे आणि अशा प्रकारच्या मेळाव्यातून एकाच वेळी अनेकांशी संवाद साधण्याची संधी प्राप्त होते.या बाबत समाजात आणखी जनजागृती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
     हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आनंद कासेगावकर,सदानंद महामुनी,मुकूंद वेदपाठक,गजू पंडीत,पांडुरंग महामुनी,हर्षल पोतदार,मनोज कासेगावकर,दिलीप दिक्षीत,डॉ. मदन क्षिरसागर,प्रविण महामुनी,रमेश पंडीत,सुभाष तरकसबंद,बाळासाहेब गोडबोले,आनंद रोपळकर,केशव दिक्षीत,राजेंद्र कासेगावकर,संजय वेदपाठक,संतोष वेदपाठक,शशी पोतदार,रमेश महामुनी,गजेंद्र घोडके यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील पांचाळ समाज बांधवांनी परिश्रम घेतले.   

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *