पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018
श्री संत वामनभाऊ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा
निलेश चाळक गहिनीनाथ गड : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी २५ कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास मंजुरी, गडाच्या पायथ्याशी रेल्वेस्टेशनलाही आणि पैठण ते पंढरपूर या रस्त्यासाठी ६५०कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची घोषणा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी केली .
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे आयोजित श्री संत वामनभाऊ महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथी महोत्सवात त्या बोलत होत्या. गडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज, ना. प्रा.राम शिंदे, आ.भीमराव धोंडे, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.जयदत्त क्षीरसागर, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आ.साहेबराव दरेकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांना वेगळे करून कधीही कुणाला यश मिळत नसते. आज राजसत्ता माझ्या हातात आहे त्याला धर्मसत्तेचा आशीर्वाद आहे. श्री संत भगवान बाबा वामनभाऊ आणि तुमच्या सारख्या जनताजनादर्दनाच्या आशिर्वादामुळेच आज मी इथे उभी आहे. या भागाच्या विकासाला गती देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गडावर सभागृह, अतिथी गृह, संरक्षक भिंत, सभा मंडप अशी सर्व प्रकारची दर्जेदार विकास कामे होणार आहेत. गहिनीनाथ गड हे वैराग्याचे प्रतीक आहे. तर भगवान गड हे वैभवाचे प्रतीक आहे. वैभव आणि वैराग्याचा समतोल राखणे आपल्याला जमले तर समाज सुखाने नांदल्या शिवाय राहणार नाही. गहिनीनाथ गडावर मोठ्या संख्येने भक्तिभावाने येणारे भाविक भक्त या देवस्थानाची शक्ती, शान आणि मान वाढवतात. संत आपल्याला मानवता धर्म शिकवतात. आपण दरवर्षी मानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येथे मोठ्या संख्येने येत असतो.
प्रा.राम शिंदे म्हणाले की, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे. या गडाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गडाचा चेहरा मोहरा बदलत आहे.गहिनीनाथ गडावर येऊन श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या समोर नतमस्तक झाल्यानंतर वर्षभर आपल्याला चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते. मी मुंडे साहेबांच्या सोबत गडावर यायला सुरुवात केली होती, असे ते म्हणाले. यावेळी आ.भीमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे, रश्मी बागल, यांचीही भाषणे झाली. पुण्यतिथी सोहळ्यास नगर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित होते. दुपारी ठिक पावणे बारा वाजता गडावर पुष्पवृष्टी करण्यात आली. दुपारी दिड वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. श्री संत वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाकडे भाविकांचा ओघ सुरू झाला. हातोला ते गहिनीनाथ गड या सहा किमी. रस्त्याच्या अंतरावर एका पाठोपाठ एक अश्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मिळेल त्या वाहनाने गहिनीनाथ गडाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांनी भावीक दर्शनासाठी येत होते. ११ वाजता श्री क्ष्रेत्र गहिनीनाथ गडावर भाविकांचा जनसागर लोटला. सर्वानी शिस्तीत दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com


