विठोबाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभारलेल्या वयोवृद्ध भाविक महिलेचा करूण अंत. ..
संग्रहित छायाचित्र
पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018
विठोबाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या एका वयोवृद्ध महिला भविकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना आज बुधवारी घडली. साखराबाई सखाराम जिरजे, ( वय 78, रा भोसेवाडी, पैठण, जि औरंगाबाद ) असे त्या महिलेचे नाव आहे.
विठोबाच्या दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून चालत असलेल्या साखराबाई यांना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हृदविकाराचा तिव्र धक्का बसला. या मध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दर्शन मंडपात तैनात असलेल्या डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्या मयत झाल्याचे सांगितले.
विठ्ठल भक्तांसाठी अद्ययावत वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी मंदिर समितीने पुढे येऊन मंदिरालगतच एखादे अद्ययावत सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल उभारण्याची गरज आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com



