👁 8 Views

पंढरीतील प्रभाग क्र. 16 मध्ये नगरसेविका सौ. रेणुकाताई घोडके यांनी राबविली स्वच्छता मोहिम

पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरीतील प्रभाग क्र. 16 मधील नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापी सौ. रेणुका धर्मराज घोडके यांनी आपल्या प्रभागात स्वच्छता मोहिम राबविली.

प्रभागातील माळी वस्ती, वृंदावन नगर, रुक्मिणी विद्यापीठ परिसर, गजानन नगर आदी भागातील ओपन स्पेस स्वच्छ केले. येथील काटेरी झुडपे तोडून या ओपन स्पेसची लेवल करुन घेतली. जेणेकरुन येथील नागरिकांच्या लहान मुलांना खेळण्यासाठी या ओपन स्पेसचा उपयोग करता येऊ लागला आहे. प्रभागातील साठलेला कचरा मशिनच्या सहाय्याने गोळा करुन त्याची विल्हेवाट लावली. या स्वच्छता मोहिमेमुळे प्रभाग क्र. 16 मधील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

स्वच्छता मोहिमेसाठी समाजसेवक धर्मराज घोडके यांच्यासह सौदागर डोके, पांडुरंग डोके, राहुल लिंगे, भारत लिंगे, वैभव डोके, उत्तम डोके, वैभव लिंगे, मनोज जाधव, निनीत मुळे, सचिन लिंगे, अप्पा थिटे आदींनी परिश्रम घेतले.  

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *