पंढरपूर येथील प्रसिध्द सुवर्णदालन पु.ना. गाडगिळ अॅन्ड सन्स लि. या सोन्याच्या दुकानात बुरखा घालून दोन महिलांनी व एका पुरुषाने भरदिवसा सोन्याची चोरी करुन पोबारा केला.
यामध्ये 80 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंढरीच्या स्टेशनरोडवरील पु.ना. गाडगिळ अॅन्ड सन्स लि. या सोन्याच्या दुकानात संक्रांतीच्या तोंडावर सोन्याच्या दागिण्यांची पाहणी व खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेऊन एक पुरुष व दोन बुरखाधारी महिलांनी दुकानात मंगळवारी दु. 3 वा.प्रवेश केला व दुकानातील सर्व कर्मचार्यांची व मालकांची नहर चुकवून 80 हजार रु. किमंतीच्या सोन्याच्या बांगड्या (28.090ग्रॅम) चोरुन नेल्या आहेत. अशी तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दुकानातील कर्मचारी सोनाली हणुमंत काशीद (25) यांनी केली आहे. सहा. पोलिस फौजदार देशमुख हे करीत आहेत.
संक्रांत सणाच्या तोंडावर दिवसा झालेल्या सोन्याच्या दागिण्यांच्या दुकानातील चोरीमुळे इतर दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com



