👁 10 Views

माघवारीत स्वच्छतेला प्राधान्य द्या उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचे प्रतिपादन

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018
माघवारीत स्वच्छतेला प्राधान्य द्या
उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचे प्रतिपादन
     पंढरपूर, दि. 11 :- माघवारी कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, वारी पुर्वी व वारी नंतर शहर, वाळवंट, नदीपात्र, 65 एकर व अन्य ठिकाणची स्वच्छता राखण्यासाठी नगरपालीकेसह सर्व विभागांनी समन्व्याने काम करणे आवश्यक आहे. वारी कालावधीत सर्व विभागांनी स्वच्छतेसह अन्य सोपविलेल्या कामाची आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी आज माघ वारी निमित्त आढावा बैठकीत केले.
     येत्या 22 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीत माघवारी होत असून, माघवारी नियोजनासंदर्भांत सांस्कृतिक भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस तहसिलदार मधुसूदन बर्गे, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नगरपालिकेचे सुनिल वाळुंजकर यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
     वारीपूर्वी नगरपालिकेने शहरातील स्वच्छता करावी, नाला, गटार दुरुस्ती बरोबर शहरातील अतिक्रमणे काढण्यास प्राधान्य द्यावे. येणा-या वारकरी-भाविकांना व शहरवासियांना वारी कालावधीत व वारीनंतर अस्वच्छतेमुळे त्रास होणार नाही याची खबरदारी नगरपालीकेने घ्यावी, अशा सूचना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केल्या. वारी कालावधीत आवश्यक असणारी शौचालये व तात्पुरती शौचालये यांचे नियोजन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करावी. शहरातील धोकादायक इमारतीबाबत आवश्यकती खबरदारी घ्यावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. नगरपालिकेमार्फत शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबतही त्यांनी बैठकीत सुचना दिल्या.
     येणा-या वारकरी भाविकास आरोग्याचा त्रास होणार नाही यासाठी  वैद्यकीय पथके कार्यरत ठेवावी पुरेसा औषध साठा, पथकामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, पथके 24 तास कार्यरत रहावीत याबाबत आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी. 65 एकर, वाळवंट, पत्राशेड आणि दर्शन मंडप येथे आरोग्य पथके कार्यरत ठेवावीत. अन्न औषध विभागाने सर्व हॉटेल व खाद्य पदार्थ विक्रेत्याकडील अन्न पदार्थाची तपासणी करावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वारी कालावधीत शहरात अखंडित वीज पुरवठा सुरु राहण्याबाबत आवश्यकती खबरदारी घ्यावी, असे प्रांताधिकारी श्री. ढोले यांनी सांगितले.
     पोलीस विभाग, एस.टी. महामंडळ, दूरसंचार, मंदिर समिती, सार्वजनिक बांधकाम यासह सर्व संबंधित विभागानी वारी विषयक त्यांच्याकडील जबाबदारी पूर्ण करावी. सर्व विभागानी त्यांचे नियोजन उपविभागीय अधिकारी कार्यालयास सादर करावे अशा सूचनाही श्री. ढोले यांनी बैठकीत दिल्या.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *