पंढरपूर LIVE 13 जानेवारी 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने चंद्रभागा नदी वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम
पंढरपूर शहरामध्ये दि.२८ जानेवारी २०१८ रोजी माघी यात्रा भरत असुन यात्रेपुर्वी शहरातील विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. पंढरपूरचे नुतन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी माघी यात्रा नियोजनाबाबत बैठक आयोजीत केली होती. या बैठकीमध्ये शहरातील व नदी पात्रातील स्वच्छता मोहिम हाती घेण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले, आरोग्य समितीचे सभापती अनुसया शिरसट, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागा वाळवंटातील विशेष स्वच्छता मोहिम राबवुन २०० सफाई कर्मचा-यांकडुन चंद्रभागा वाळवंटातील स्वच्छता करण्यात आलेली आहे. यात्रा कालावधीतसुद्धा ६५ एकर (भक्तीसागर), चंद्रभागा नदी वाळवंट, पत्रा शेड येथे जास्तीत जास्त सफाई कर्मचा-यांची नेमणुक करुन शहरातील स्वच्छता करण्यात येणार असल्याचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर व आरोग्य अधिकारी डॉ.संग्राम गायकवाड यांनी सांगितले. सदरची विशेष स्वच्छता मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर,बर्मा पवार, कुमार भोपळे, मारुती मोरे हे प्रयत्नशील आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com









