👁 6 Views

लोकमान्य विद्यालय, पंढरपूर, येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा

पंढरपूर LIVE 21 Jun 2018

         लोकमान्य विद्यालया मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला. शिक्षण समिती  सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले की तरुण वयात योग-प्राणायाम ची आवड लागल्यास ती आयुष्यभर टिकते,माणूस निरोगी राहतो, विद्यार्थ्यांना योग प्राणायाम ची आवड निर्माण व्हावी यासाठीच या शिबिराचे आयोजन केले असल्याचे विवेक परदेशी सांगितले. निश्चितपणाने दररोज योग साधना केल्यास मानवाचे मानसिक व शारिरीक आरोग्य चांगले राहते त्यामुळे नियमीतपणे सर्वांनी योग साधना करावी असे अवाहन नगरपरिषदेचे उपमुख्यधिकारी सुनील वाळुजकर साहेब यांनी केले.
          विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील वाळूजकर, सचिव प्रशांत अगावणे, खजिनदार चंदुलाल सुपेकर, संचालक जयंत हरिदास, संचालक विवेक परदेशी यांनी विद्यार्थ्यांना योग-प्राणायाम चे महत्व सांगून विद्यार्थ्यांना आदर्श  प्रात्यक्षिके दाखवली व विद्यार्थ्यांकडून योग-प्राणायाम करून घेतले.
     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोकमान्य विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *