👁 8 Views

माहेश्वरी समाजातर्फे श्री महेश नवमी उत्सव थाटामाटात साजरा..

पंढरपूर LIVE 23 Jun 2018

माहेश्वरी सभा, माहेश्वरी युवा संघटन व माहेश्वरी महिला संघटन यांच्या वतीने माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणजेच श्री महेश नवमी उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. माहेश्वरी सभा तर्फे या दिवशी रक्तदान शिबीरचे आयोजन केले असता त्यामध्ये ४५ महिला-पुरुषांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. तर महिला संघटनेच्या वतीने १५०० ग्लास गुलाब सरबताचे वाटप श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात करण्यात आले.

सदरचा कार्यक्रम जेष्ठ पत्रकार व भागवताचार्य श्री बाळासाहेब 
बडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमच्या सुरुवात प्रमुख मान्यवर व तिन्ही संघटन अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते महेश पूजन करून करण्यात आली. तिन्ही संघटने च्या अध्यक्षांनी श्री जुगलकिशोर बाहेती, श्री सुनील राठी व श्रीमती शांताबाई भट्टड यांनी उपस्थितांना समोर आपली मनोगते मांडली.
सभा सचिव डॉ. श्री संदीप मर्दा यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा सर्व उपस्थितांना करून दिला. सदर कार्यक्रमात श्री बडवे यांनी माहेश्वरी समाजाच्या उत्पत्तीबद्दलची माहिती देत, आजच्या काळातील संघटनेचे महत्व या विषयावर सुंदर असे भाष्य करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमांतर्गत माहेश्वरी युवा संघटनेतर्फे मागील आठवड्यात आयोजित केलेल्या एकदिवसीय क्रीडा प्रतियोगीतेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विजेत्यांचे सत्कार सन्मान पत्र व मेडल देऊन करण्यात आले. तसेच मागील वर्षात समाजातील शैक्षणिक क्षेत्रात व विशेष प्राविण्य दाखविलेल्या विद्यार्थी व लहान मोठ्यांचे सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सीए पवनकुमार झंवर यांनी केले. आभार प्रदर्शन विशाल मर्दा यांनी केले. कार्यक्रम श्री निम्बार्क राधा-कृष्ण मंदिर या ठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रमास सर्व माहेश्वरी समाज मोठ्या संखेत उपस्थित असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *