पंढरपूर LIVE 23 Jun 2018
गोपाळपूरच्या श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या १६ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड!
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्येआत्त्तापर्यंत तब्बल ३०६ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड
पंढरपूरः- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’(TCS) या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हीवद्वारे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड झाली असून आत्तापर्यंत टी.सी.एस. मध्ये स्वेरीचे एकूण ३०६ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे एच आर. प्रमुख अंकुर सिन्हा,बी. कला, इंशा शेख तसेच त्याचबरोबर १५ जणांच्या तांत्रिक पॅनल निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजला भेट देवून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त,आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील भास्कर पराध्ये, शिवम कोत्तुर,मयुरेश कुलकर्णी, विश्वजित कदम, धीरज मोरे आणि खेलबा पुजारी असे ६ विद्यार्थी,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या शीतल सुरवसे तर कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग विभागातील कविता माने, सीमा गायकवाड, ज्योती वाघमारे, स्नेहा घाटकर,मृणालिनी माने, श्रद्धा कवडे, पूजा खुळे, हर्षा बारबोले व सुदर्शन बरडे हे नऊ विद्यार्थी असे मिळून एकूण १६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसमध्ये गतवर्षी पर्यंत २९० एवढी विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली होती त्यात आता या नवीन १६ विद्यार्थ्यांची भर पडली असून टीसीएस कंपनीत आता विक्रमी ३०६ जणांची वर्णी लागली आहे. या निवडीवर प्रतिक्रिया देताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी निवड प्रक्रियेचे प्रमुख अंकुर सिन्हा म्हणाले की, ‘येथील शिस्तबद्ध विध्यार्थी पाहून आमच्यातील प्रत्येकजण प्रभावित झाला असून प्रचंड मेहनत करून येथील विद्यार्थी भविष्यात खूप पुढे जातील. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व त्यांच्या टीमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.’असे मत यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात मात्र आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.
सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ यांच्या नेतृत्वाखाली प्रा.एस.व्ही.दर्शने,प्रा.डी.ए.कुंभार आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले असून संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडा तसेच स्वेरी व्यवस्थापनातील इतर सहकारी,स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तीनही महाविध्यालायाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’कंपनीमध्ये स्वेरीतील आत्तापर्यंत तब्बल ३०६ विद्यार्थ्यांची निवड झाली असून दरवर्षीपेक्षा यंदा सन २०१७-१८ चा विचार केल्यास कॅम्पस इंटरव्यूमधून निवड होणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते.

|

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com