👁 4 Views

महाराष्ट्राच्या उपराजधानीत गुंडाराज… रेती-कोळसा माफियाचा तलवारीचे वार करून निर्घृण खून

पंढरपूर LIVE 30 Jun 2018



नागपूर – उपराजधानीला गुन्हेगारांची राजधानी म्हणावे की काय असा प्रश्न पडावा अशी जिल्ह्यात निर्घृण हत्या झाली आहे. ही हत्या जिल्ह्यातील कन्हान वराडा फाट्याजवळील बंद टोल नाक्याजवळ झाली. विनोद यादवराव सोमकुंवर (३६) असे मृताचे नाव आहे. रेती-वाळू माफिया अशी परिसरात ओळख असलेला विनोद हा गोडेगावचा उपसरपंचही होता.

विनोद आपल्या कारने वडाळा शिवारातील भावाच्या डुमरी रोडवरील ढाब्यावर जात असताना मोटारसायकलवरून अचानक तिथे हल्लेखोर आले. त्यांनी कार थांबवत विनोदला बाहेर काढून त्यांच्यावर तलवारीच्या साहाय्याने वार केले. तलवारीचा वार गळ्यावर लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे विनोदचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेमुळे कन्हान परिसरात एकच खळबळ झाली. घटनेची माहीती मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळावर पंचनामा करुन विनोदचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. गोंडेगावचे उपसरपंच असतानाही विनोद हा अवैध रेती आणि कोळसा प्रकरणाशी संबंधित होता. कन्हान पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध रेती आणि कोळसा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गोंडेगाव घाट हा रेती चोरीसाठीच कुप्रसिद्ध आहे. या घाटावरून विनोद आणि काही माफियांचा वाद सुरू होता. ही हत्या अवैध वाळू व्यवसायाच्या जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *