👁 9 Views

संत तुकोबांच्या पालखीचे भुवैकुंठ पंढरी नगरीकडे प्रस्थान.. प्रस्थान होताच वरुणराजाने केले स्वागत!!

पंढरपूर LIVE 5 July 2018

संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. कपाळी केशरी गंध आणि मनात विठुरायाच्या भेटीचा छंद बाळगलेल्या लाखो वैष्णवांच्या जथ्थ्यात संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आज सायंकाळी चारच्या सुमारास देहूतून पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

पालखी प्रस्थान होताच वरुणराजानेही जोरदार हजेरी लावल्याने वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येवू देवू नकोस, असे साकडेही वारकऱ्यांनी लाडक्या विठुरायाला यावेळी घातले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा प्रस्थानाच्या कार्यक्रमाला गुरूवारी पहाटे नैमितिक महापूजेने सुरुवात झाली. पहाटे संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन मंदिरात महापुजा करण्यात आली. यानंतर सकाळी ७ वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधीची महापूजा झाली. सकाळी १० ते १२ संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काल्याचे किर्तनही झाले.  दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. यानंतर मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर फुलांनी सजविलेली तुकाराम महाराजांची पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडली.  आज सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पालखी इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामी दाखल होईल. पालखी प्रस्थानावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट सपत्नीक, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासोबत मनी पंढरीचा ध्यास, टाळ मृदंगाचा गजर, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी विठुरायाचे नाम घेत निघालेला वैष्णवांचा मेळा हे चित्र अनेकांनी डोळ्यात, मोबाईलमधील कॅमेऱ्यात साठवून ठेवले. पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्हींच्या माध्यमातूनही सर्वत्र नजर ठेवण्यात येते आहे. पालखी सोहळ्याचा आज इनामदार वाड्यात मुक्काम आहे. उद्या पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *