👁 4 Views

‘मेरी याद में तुम ना आँसू बहाना, ना जीको जलाना’ संगीतकार मदनमोहन यांच्या स्मृदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा

पंढरपूर LIVE 14 July 2018

बगदादमध्ये जन्मलेल्या संगीतकार मदनमोहन रायबहादूर चुनिलाल यांचा आज स्मृतिदिन… 

सिनेधंद्यात वजनदार आसामी म्हणून नाव कमावलेल्या बापापोटी जन्मलेल्या मदनमोहनने सारे आयुष्य प्रवाहाविरुद्ध पोहण्यात घालवले. दुस-या महायुद्धात फौजी म्हणून सहभागी असणा-या मदनमोहनने सैन्यातील नोकरी सोडल्यानंतर लखनौ आकाशवाणी केंद्रावर काही काळ काम केले. नंतर कसलेही शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण नसताना सिनेसृष्टीत प्रवेश केला तो संगीतकार म्हणूनच! रागदारीची फोडणी असलेली अस्सल भारतीय बनावटीची सुमधुर गीते आणि नशिल्या गझला देणारा हा संगीतकार. कवितेला चाली लावाव्यात, तशा सलग चाली कमी वाद्यवृंदाची साथ घेऊन हा अवलिया, विविध रागांत गुंफत राहिला. ‘मै पागल मेरा मनवा पागल’ ही प्रेमभंगाची दुखरी भावना तलत मेहमूदच्या तरल, नाजूक सुरावटीत बांधणा-या मदनमोहनने ‘जिसे दिलमे बसाना चाहा था’, ‘तेरी चमकती आँखोंके सामने’ अशा मस्त गझला लताच्या आवाजात रसिकांना सादर केल्या. चित्रपटात शास्त्रोक्त संगीताचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल सूरसिंगार संसदेने त्यांना दोन वेळा ‘स्वामी हरिदास’ पारितोषिक बहाल केले. ‘दस्तक’च्या संगीताबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या मदनमोहननी आयुष्याची संध्याकाळ मात्र ‘अब गमको बना लेंगे जीने का सहारा, दिल टूट गया छूट गया साथ हमारा’ असे आर्त सुरात म्हणत व्यतीत केली. ‘मेरी याद में तुम ना आँसू बहाना, ना जीको जलाना’ असे म्हणत हा गझलसम्राट काळाच्या पडद्याआड गेला.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्हनं झेप घेतली आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *