पंढरपूर LIVE 14 July 2018
माऊलींच्या पालखीने पुणे जिल्याचा निरोप घेतला असून सातारा जिल्ह्यात माऊलींचे आगमन झाले आहे. प्रथेप्रमाणे माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळा नीरेकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहारीसाठी पिंपरे खुर्द येथील अहल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहिरीच्या समोर विसावला. नीरा येथे पालखी सोहळा अकराच्या सुमारास दाखल झाला. शिवाजी चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य गोरखनाथ माने, सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नेते दत्ता चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सुभाष लिंबरकर उपस्थित होते. येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणी माउलींच्या पादुका दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात
विसाव्यानंतर प्रथेप्रमाणे विश्वस्तांनी माउलींच्या पादुका नीरा स्नानासाठी नेल्या. दत्त घाटावर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलीऽ माउलीऽऽ नामाच्या गजरात पादुकांना नीरास्नान घालण्यात आले. गर्दीमुळे अवघा घाट भक्तिमय झाला होता. माउलींच्या नीरा स्नानानंतर पालखी सोहळ्याला जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक, उपअधीक्षक तेजस्विनी सातपुते, भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, रामदास शेळके, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के आदींनी निरोप दिला. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव माणकुंभरे, वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे, खंडाळ्याचे सभापती मकरंद मोटे, खंडाळ्याच्या गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्यासह सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
नीरा हद्दीत पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर शिवाजी चौकात पडलेल्या खड्ड्यात पाणी साठल्याने तेथून जाताना वारकऱ्यांची गैरसोय झाली. यंदाही अचानक नीरा स्नानाची जागा बदलण्यात आली. गेल्या वर्षी घातलेल्या जागेच्या अलीकडे या वर्षी नीरास्नान घालण्यात आले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्हनं झेप घेतली आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com