👁 4 Views

पंढरीत मांस, मटण, मासे विक्री व र्प्राण्यांची कत्तल करणेस बंदी… आषाढी यात्रा कालावधीत कलम 144 चे आदेश जारी

पंढरपूर LIVE 14 July 2018

पंढरपूर-दि.14- षाढी यात्रे निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर   शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी  उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम 1973 मधील कलम 144 (1) व (3) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार आदेश जारी केले असल्याची माहिती शहर पोलीस निरिक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली.
आदेशानुसार पंढरपूर शहरात  दिनांक 13 ते  27 जुलै 2018 पर्यंत आषाढी यात्रा कालावधीत  शहरामध्ये मांस, मटण, मासे विक्री व प्राण्याची कत्तल करण्यास बंदी घातली आहे. तसेच  विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरापासून 100 मीटर अंतरामध्ये पुर्व परवानगी शिवाय  अवैध गॅस सिलेंडरचा साठा अथवा वापर करणे, फटाके फोडणे,  पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येवून गोंधळ करणे किंवा गोंधळ निर्माण होईल अशा प्रकारची वर्तणूक करण्यास व खाजगी वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात


तसेच आषाढी वारीमध्ये चौफाळा येथे  मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी  दोरीचा वापर केला जातो.चौफाळा येथील कृष्ण मंदिर परिसरात फुले व पुजेचे इतर साहित्य विक्रेत्याची गर्दी असते. या ठिकाणची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी   फौजदारी प्रक्रीय संहिता  कलम 1973 मधील कलम 144 अन्वये उपविभागीय अधिकारी श्री. ढोले  यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार गोपाळ कृष्ण मंदीर परिसरात  दिनांक 22 ते 24 जुलै 2018  या कालावधीत  सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत फुले, फोटो, प्रसाद विक्रेते तसेच हात गाडीवाले यांना साहित्य विक्रीस मनाई करण्यात आली असल्याची माहिती  शहर पोलीस निरिक्षक श्री. पाडुळे यांनी दिली.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह नं झेप घेतली आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *