👁 6 Views

पंढरपूर तालुक्यातील प्रलंबित कृषी ग्राहकांना वीजपुरवठा करण्याठी महावितरणकडून 53 कोटी 35 लाख रुपयांची तरतुद- आ. भारतनाना भालके

पंढरपूर LIVE 17 July 2018


मंगळवेढा  प्रतिनिधी
 पंढरपूर विभागातील प्रलंबित आलेल्या कृषी ग्राहकांना उच्च दाब प्रणाली उभारून वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून 2425 ग्राहकांसाठी 53 कोटी 35 लाख  रुपयांची तरतुद करण्यात आल्याची माहिती आ भारत भालके यांनी दिली 
नागपूर येथील आधिवेशानात आ भारत भालके यांनी पंढरपूर विभागातील पायाभूत सुविधा आराखडा 2 अंतर्गत शेतीपम्प विद्युतीकरनाचे काम ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रखंडल्याचे सांगून अनेक वर्षापासून शेतकऱयांनी  कृषी पंपाच्या वीजेसाठी पैसे भरूनही त्यांना वीज मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देत विजेच्या कामासाठी निधी देण्याची मागणी केली तसेच स्थानिक पातळीवर ही अधिकाऱ्याकडे बैठका व पत्रव्यवहार करून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न केले होते तसेच ही बाब ऊर्जा मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे  यांच्यासमोर विधानसभेत  हा प्रश्न मांडत शेतकऱयांना न्याय देण्याची मागणी केली
 त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आ भालके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की पंढरपूर विभागासाठी 31 मार्च 2018 अखेर प्रलंबित 2425 कृषी ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी53कोटी 35 लाखाची तरतुद करण्यात आली असून त्यामध्ये उच्चदाब वाहिनी970किमी,वितरण रोहित्र संख्या 2093 निश्चित करण्यात आली आहे यामध्ये पंढरपूर तालुक्यातील478,मंगळवेढा519,सांगोला1428 इतके कृशी पंपाचे प्रलंबित ग्राहक आहेत तसेच सध्या 33कोटी 43लाखाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले या कामामुळे पंढरपूर विभागातील प्रलंबित असणारी महावीतरणकडील शेतकऱयांची विजेची कामे मार्गी लागणार आहेत तसेच इन्फ्रा 2 मधील ज्या शेतकऱयांची कामे ठेकेदाराने अपुरी ठेवली होतीअशा शेतकऱयांची कामेही या योजनेतून करण्याची मागणी आ भालके यांनी यावेळी केल्याने ती कामेही लवकरच मार्गी लागणार आहेत
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *