👁 6 Views

स्व.भैय्युजी महाराजांच्या आठवणीने अंबाजोगाईकर गहिवरले..राष्ट्रसंत प.पु.स्व.भैय्युजी महाराजांच्या अस्थि कलशाचे भक्त गणांकडून दर्शन!

पंढरपूर LIVE 20 July 2018

अंबाजोगाई (प्रतिनिधी) राष्ट्रसंत प.पु.स्व.भैय्युजी महाराज व अंबाजोगाई यांचे नाते अतुट होते. जेव्हा-जेव्हा महाराज मराठवाड्यात यायचे तेव्हा ते आवर्जुन अंबाजोगाईला यायचे अंबाजोगाईचे अध्यात्मिक महत्व महाराज जाणून होते. महाराजांवर नितांत श्रद्धा असणारे भक्त त्यांना अंबाजोगाईत मिळुन आले.महाराजांच्या आकाली जाण्याने भक्त परीवार दुःख सागरात बुडाला आहे.बुधवार दि.18 जुलै रोजी अस्थिकलश रथयात्रा अंबाजोगाईत पोहोंचली महाराजांच्या आठवणीने अंबाजोगाईकर गहिवरले.अस्थिकलशाचे दर्शन घेवून सुर्योदय परिवार व भक्तगणांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अध्यात्माच्या बळावर लोककल्याणकारी कार्य करून सामाजिक क्रांतीचे विचार समाजात रूजविणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्व लाभलेले राष्ट्रसंत प.पु.स्व.स्व. भैय्यूजी महाराज यांचे काही दिवसांपुर्वी दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने भक्त परिवार अजुनही दुःखाच्या सावटाखाली असून तो अद्यापही या दु:खातून सावरलेला नाही. राज्याच्या कोनाकोपर्यात त्यांचा शिष्यसंप्रदाय असून त्यांना महाराजांच्या अस्थिकलशाचे दर्शन व्हावे.महाराजांप्रती असलेली श्रद्धा व आदरभाव हे श्रद्धांजलीच्या माध्यमातून व्यक्त करता यावेत यासाठी अस्थिकलश रथयात्रा दिनांक 5 जूलै ते 27 जूलै 2018 या कालावधीत इंदोर पासून निघून ती महाराष्ट्रात सर्वदुर पोहोंचणार आहे. बुधवार,दि.18 जुलै रोजी अस्थिकलश रथयात्रा अंबाजोगाईत पोहोंचली.
 श्री.योगेश्वरी देवी मंदिर परिसरातील सभागृहात राष्ट्रसंत प.पु.स्व.भैय्युजी महाराज यांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी सुर्योदय परिवाराचे बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन वाघमारे,माजी नगरसेवक सतिषनाना लोमटे,अशोकराव गाढवे,राजेंद्र महाराज शास्त्री,रोहित देशमुख,
मोहन गोेंडे,साहित्यीक दिनकर जोशी,पत्रकार गजानन मुडेगावकर, पत्रकार रणजीत डांगे, संतोष डागा,भागवत बुरगे,गजानन औसेकर, विनोद निकम,गणेश जाधव,सौरभ कुलकर्णी, राहुल कोंबडे,नवनाथ औसेकर,संजय पाटील, बाबा पठाण,संजय लामतुरे,सुशिल वाघमारे, शेख सादेक,बाळासाहेब राडीकर आदींसहीत भक्तगण व शहरातील मान्यवर तसेच सुर्योदय परिवाराचे अंबाजोगाई शहर व तालुक्यातील महाराजांच्या शिष्यगण व भक्त परिवाराने  अस्थिकलशाचे दर्शन घेतले. 
 
श्रद्धांजली म्हणून विद्यार्थ्यांना वही,पेनचे वाटप
सुर्योदय परिवाराचे बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन वाघमारे यांनी राष्ट्रसंत प.पु.स्व.भैय्युजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी योगेश्वरी नुतन विद्यालय मंदिर विभागातील सुमारे 50 विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप केले. लवकरच इतरही शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणार असल्याची माहिती अर्जुन वाघमारे यांनी दिली.पुढे बोलताना अर्जुन वाघमारे यांनी सांगितले की,भैय्युजी महाराजांच्या प्रेरणेने सुर्योदय परीवाराने देशभरात जलसंधारण, वृक्ष संवर्धन,12 लाख 75 गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.
आत्महत्याग्रस्त, शेतकर्‍यांना व कुटुंबियांना मदत केली. देशात 28 लाख 25 हजार विद्यार्थ्यांची भारतीय संविधानावर आधारीत परिक्षा घेण्यात आली.सुर्योदय परिवाराच्या वतीने
एक हजार आकरा बेवारस प्रेतांवर अंतिम संस्कार करण्यात आले. साडेतीन लाख गरीब शेतकर्‍यांना बी-बियाणे वाटप करण्यात आले.950 खेड्यात जैवीक खेती अभियान राबविले,410 पाण्यांचे हौद जनावरांसाठी तयार केले.तीन लाख 10 हजार वृद्धांना आधार कार्ड वितरण केले. 12 कारागृहांमध्ये वाचनालय व संगणक कक्ष स्थापन केले.1 लाख 43 हजार निराधारांना थंडी पासुन बचाव करणार्‍या ब्लँकेटचे वाटप केले. सोबतच पक्षांसाठी 7 लाख 75 हजार 450 मातीचे पात्र वितरण केले.या सोबतच 1297 निर्दन शेतकर्‍यांना शेततळी बनवून देण्यात आली.सामाजिक उत्तर दायित्व निभावण्यासाठी भैय्युजी महाराजांनी सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून सुमारे 18 हजार गरीब कुटूंबातील मुलींचे विवाह केले असल्याची माहिती देवून यापुढे ही भैय्युजी महाराजांच्या प्रेरणेने समाजकार्य सुरूच ठेवणार असल्याचे अर्जुन वाघमारे यांनी सांगितले. 
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *