👁 7 Views

॥ जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता॥ वारकरी भाविकांची परतीची वारी सुरु!

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 24 July 2018

विठ्ठलाच्या तेजाचा अंश मनात घेऊन आयुष्यात येणार्‍या संकटांशी दोन हात करण्यासाठीचं नवसामर्थ्य घेऊन जड अंत:करणाने वारकरी घेताहेत भुवैकुंठ पंढरी नगरीचा निरोप… 

ऊन, वारा, पाऊस  कशाचीही तमा न बाळगता पंढरीच्या वारीला चालत आलेल्या नि:स्सीम वारकर्‍यांना आस असते ती फक्त विठ्ठलाच्या भेटीची… विठ्ठलाचे मुख दर्शन, पददर्शन लाभले तर बहुत जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान या विठ्ठल भक्तांना लाभते. पांडुरंगाच्या चरणी लीन होताना प्रत्येक भाविकाचा ऊर भरुन आलेला असतो. 
डोळ्यातून आनंदाश्रु ठबकत असतात. दीनाचा सोयरा मायबाप पांडुरंगाला डोळे भरुन पहाताच वारकरी भाविकांच्या अंगात नवचैतन्य भरलेले असते. अनेकजण पंढरी नगरीतील साधु संतांची पायधुळ मस्तकाला लावुन चंद्रभागेचे स्नान करुन नुसत्या पांडुरंगाच्या कळसाच्या दर्शनानेही हर्षित होऊन आपली वारी पुर्ण झाल्याचेे समाधान मानतात. श्रीविठ्ठलाच्या तेजाचा अंश मनात घेऊन आयुष्यात येणार्‍या संकटांशी दोन हात करण्यासाठीचं नवसामर्थ्य घेऊन वारकरी भाविक जड अंत:करणाने भुवैकुंठ  पंढरी नगरीचा निरोप घेताना आढळून येत आहेत. रेल्वे स्टेशन, बसस्थानकं आदी ठिकाणी आपापल्या गावी परतण्यासाठी भाविकांची लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे.
जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता॥
आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी बसने आणि रेल्वेने आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्य परिवहन महामंडळाने सुरुवातीपासून नियोजन करून राज्याच्या सहा विभागांतून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सोय करून ठेवली होती. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनानेही भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय केली होती. यामुळे 3 ते 9 जुलैच्या दुपारी 1 वाजेपर्यंत 79 हजार 975 भाविक रेल्वेने परतले असल्याची माहिती रेल्वे पंढरपूर विभागाचे मुख्य वाणिज्य अधिकारी एम. के. गोसावी यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाची शहरातील दोन्ही बसस्थानके बंद ठेवण्यात आली होती. त्याऐवजी शहराबाहेर तात्पुरती बसस्थानके तयार करण्यात आली होती. यात्रा कालावधीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या बसस्थानकांकडे रिक्षा व इतर वाहनांनी जाण्यासाठी जादा पैसे खर्च करावे लागत होते.
आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात येणार्‍या पालख्यांबरोबर गर्दी कमी आहे, असा अनेक जणांचा अंदाज असला तरी महाराष्ट्र परिवहन महामंडळावर याचा काही परिणाम झाला नाही. यावेळी बसच्या वाढीव खेपा देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणीही बस ये-जा करीत होत्या. गेल्यावर्षी आषाढी एकादशीच्या रात्री 12 वाजेपर्यंत 6242 फेर्‍या तर यंदा 7284 फेर्‍या झाल्या आहेत. गेल्यावर्षी द्वादशीपर्यंत 35 हजार 400 प्रवासी तर यावर्षी 36 हजार 470 प्रवासी वाहतूक झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रताप सावंत यांनी दिली आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *