👁 9 Views

सकल मराठा समाजाची बदनामी केल्याबद्दल मुख्यमत्र्यांनी जाहीर माफी मागावी-संदीप मुटकुळे

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 25 July 2018

पूजेला विरोध करणारे छत्रपतींचे मावळे होऊच शकत नाही असे वक्तव्य करीत पंढरपूर येथे शासकीय पूजेसाठी उपस्थित न राहता त्याचे खापर मराठा समाजावर फोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याबद्दल त्यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे  यांनी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला महापूजेसाठी जाण्याचे रद्द केल्यानंतर माध्यमांशी केलेल्या वक्तव्यावरून आता नविन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दर्शनासाठी येण्याविषयी घातपात होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.त्यांनी तो अहवाल जाहीर करावा अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी करणारी मुलेही वारकर्‍यांचीच मुले आहेत.त्यामुळे त्यांना घातपाती ठरविणे वारकर्‍यांना अपमान आहे अशी टीकाही त्यांनी केली.
काल मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस होता शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुंबई दौर्‍यावर होते, त्यामुळे त्यांनी पंढरपूरला पूजेला जाण्याचे रद्द केले. असे असताना त्याचे खापर मात्र सर्वसामान्यांवर फोडले आणि वारकर्‍यांसह राज्यातील जनतेचीही दिशाभूल आणि फसवणूक केली असा दावाही त्यांनी केला.सरकार स्वतः न्यायालयात अहवाल लवकर सादर करत नसल्याने आरक्षण मिळण्यास उशिर होत आहे असेही तेम्हणाले.मराठा क्रांती मोर्चाकडून दोन वर्षांपूर्वी अतिशय शांततेच्या वातावरणात मराठा समाजाने 58 मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात काढले. त्यामध्ये कोठेही गोंधळ झालेला नाही. परंतु, मुख्यमंत्री हे मात्र सोयीस्कररित्या भूमिका घेतात. त्यामुळे त्यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा आगामी काळात राज्यातील वातावरण बिघडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *