👁 8 Views

विषारी सर्पदंश झालेला शेळवे येथील मुलगा डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे वाचला

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 27 July 2018

दि. 24 जुलै रोजी विषारी सर्पाने दंश केल्या शेळवे येथील एका मुलाला पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन वाचवले आहे.
आषाढी वारी दरम्यान कॉटेज हॉस्पिटल ला ICU मध्ये पेशंट ला भेटण्यास गेलो असता सांगलीचे डॉक्टर एम.एन.अंबरर्डेकर सेवा म्हनून दर वर्षी वारीला पंढरपूरला येतात त्यांची भेट झाली व डॉक्टरांनी  वारकरी यशवंत लाटकर कराड दिंडीत चालत आले होते त्यांना चारच दिवसांत हार्टअटॅक पासून रिकवर केले.
      दि.२४ जुलै रोजी दुपारी पंढरपूर पासून जवळील शेळवे गाव येथील तेजस गाजरे शेतात गवत काढत असताना साप चावला, साप काळा कलर वर पांढरा रंग असा अंदाजे गोनस जातीचा होता. त्यावेळी त्याला काही झाले नाही पण तेथून एक ते दिड तासात ते अर्बन बँक पंढरपूर परियंत आले व तेजस ला जोरात चक्कर येऊ लागली, कसेबसे त्याला कॉटेज हॉस्पिटल येथे आणले व आॅडमिट केले, त्याला ICU मध्ये आणण्यात आले व सांगलीचे डॉ एम.एन.आंबरर्डेकर सर यांना सोपवण्यात आले, त्यावेळी तेजस बेशुद्ध होता, सर्व जन घाबरले होते, डॉ.एम.एन.आंबरर्डेकर सर व कॉटेज चे सहकारी यांनी खूप प्रयत्न केले सलाईन  व वेगवेगळे व ईंदिक्शन देण्यात आले
व एम.एन.आंबरर्डेकर सर यांना थोड़ेसे यश आले, त्यांनी तुझे नाव काय विचरले असाता त्याने तेजस असे सांगितले तेव्हा ऊपस्थीत डॉक्टर च्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले, त्या दिवशी पूर्ण रात्र डॉ एम.एन.आंबरर्डेकर सर त्या पेशंट चे बेड जवल बसुन उपचार करत होते.  पेशंट बरे पैकी रिक्वर झाला. वारी संपत असल्यामुळे डॉक्टरांची सांगलीला परत जाण्याची वेळ येत होती, सांगली तुन वारंवार फोन येत होते दवाखाना कधी उघडणार , हे जेव्हा तेजस चे वडिलांना कलाले तेव्हा त्यांनी डॉक्टरांना घाबरत विचारले तुम्ही परत जानार का? व एम.एन.आंबरर्डेकर डॉक्टरांनी सांगीतले जो परियंत तेजस पुर्ण रिकवर होत नाही तो परियंत मी कुठेच जाणार नाही व वडिलांना रडू कोसळले व डॉक्टरांना कळाले तेजसच्या वडिलांनी तेजस अॅडमिट झाल्या पासून काहीच खाल्ले नाही डॉक्टर नी स्वतः तेजस चे वडील यांना धीर देऊन त्यांना हॉस्पिटल चे बाहेर नेऊन चहा व बिस्कीट खाऊ घातले व काळजी करू नका असे सांगितले.
        तेजसच्या वडिलांनी कॉटेज हॉस्पिटल चे प्रमुख जयश्री ढवळे मॅडम, डाॅ.सचीन वालुजकर, डॉ नंदकुमार घोळवे, डॉ वनीता वाघ व सेवार्थ आलेले परगावचे डॉ दतात्रय वाघमोडे, डॉ चेतन शिखरे,डॉ गिता कुलकर्णी, डॉ पांढरे मॅडम यांचे आभार मानले.
     डॉ.एम.एन.आंबर्डेकर सर यांचे विषयी अधिक माहिती जाणून  घेण्यासाठी कॉटेजे हॉस्पिटलमधील स्टाफ व सहकारीं कढुन माहिती घेतली असता मला कळाले की डॉक्टर सांगली चे असून दर आषाढी व कार्तिकी वारीला ते ४ ते ६ दिवसा साठी पंढरपूरला येतात व बिगर मोबदला येतात. सांगलीत त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल व ICU युनीट असून ते वारी साठी ते त्याचे हॉस्पिटल बंद करून ४ ते ६ दिवसासाठी पंढरपूरला सेवा म्हनून येतात व येताना त्यांचे गाडीमध्ये बसतील तेवढे  आवश्यक व लेटेस्ट मशिनरी, ईंधिक्षण व काही औषधे घेऊन येतात व येथील त्याचे अंडर ऑडमिट पेशंट रिकवर झाल्या नंतरच ते सांगली ला परत जातात.
         मागील आषाढी वारी वेळी एक पेशंट सिरीयस होता त्यावेळी डॉक्टर नी न झोपता सलग १८ तास जागून पेशंटला ट्रिटमेंट दिली, काही डॉक्टरनी त्यांना विनंती केली आपण थोडी विश्रांती घ्यावी, तेव्हा ते व्हणाले यांच्याकडे मला लक्ष द्यावे लागणार आहे, त्या डॉक्टरांनी सांगितले आपण येईस परीयंत आम्ही कोठेही जाणार नाही ,असे सांगितल्यावर त्यांनी एक तास विश्रांती घेतली व काम चालू केले.          
         एका वारी मध्ये एक दुर्मिळ औषद उपलब्ध नव्हते,त्यावेळी डॉक्टरांनी स्वखर्चाने, तातडीने मेडिकल मधुन शोधून ते औषद ईंधिक्शन आणले व पेशंटला दिले.
      एकदा एका गरीब पेशंटला कॉटेज हॉस्पिटल चे नाॅमिनल बिल भरायला व जेवणासाठी पैसे नव्हते त्यावेळी डॉ.एम.एन.आंबरर्डेकर सर यांनी स्वतः जवळचे पैसे त्यांना दिले. 
          त्यांचे हे विशेष कार्य जाणून मि त्याचे सत्कार करण्यासाठी  हार,नारळ घेऊन गेलो असता त्यांनी सत्कार स्वीकारला नाही व हे माझे कर्तव्य असल्याचे सांगून मला सेकंड केले.खरोखरच असे कित्येक लोक स्वतःचे नाव न सांगता , कोणतेही सत्कार न स्वीकारता, गुप्त पणे, प्रामाणिक पणे,स्वखर्चाने काम करतात, खरोखरच अशा लोकांमध्ये पांडुरंग आहे. देव मनुष्या मध्ये आहे म्हणतात, खरोखरच डॉ एम.एन.आंबरर्डेकर सर यांच्या सारख्या लोक या जगतात आहे, त्याबद्दल डॉ अंबरर्डेकर सर व त्यांना घडवनारे त्यांच्या माता,पिता व गुरुजनांचे खुप, खुप आभार. प्रत्येक मनुष्यात देव आहे, आपण ते ओळखल पाहिजे व जागे केले पाहिजे. मि विनंती केली असता माझ्या आठवणी करता फोटो घेण्यास आंबरर्डेकर सरांनी परवागीं दिली. त्यांचे खुप आभार.
     
  नगरसेवक 
विवेक अमरनाथ परदेशी
नगरसेवक पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *