👁 8 Views

भविष्यात संशोधन अधिक गतीने होईल- बी.ए.आर.सी.चे विभागीय संचालक डी. व्यंकटेश्वरलु

पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट  2018 

शास्त्रज्ञ डी. व्यंकटेश्वरलु यांची स्वेरीला सदिच्छा भेट
पंढरपूर- ‘स्वेरीतील संशोधन विभागातून विकसित केलेली बियाणे, विविध संशोधन प्रकल्प पाहून खरच याचे नवसंशोधकांनी अनुकरण करावे असे कार्य स्वेरीतून नित्य होत आहे.येथील संशोधन प्राध्यापकांमध्ये अहोरात्र काम करण्याची क्षमता पाहिल्यास भविष्यात भारतातील संशोधन अधिक गतीने होईल असे वाटते.’ असे प्रतिपादन विशाखापट्टणममधील बी.ए.आर.सी.चे विभागीय संचालक डी. व्यंकटेश्वरलु यांनी केले.

        येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये आज ते संशोधन विभागाची पाहणी व कार्य पाहण्यासाठी आले होते यावेळी ते संशोधक प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी डी. व्यंकटेश्वरलु यांचे स्वागत करून स्वेरीची वाटचाल व स्वेरीतील संशोधन प्रकल्पांची सविस्तर माहिती देवून संशोधन करण्यासाठी शासनाकडून आलेला निधी याबाबत माहिती दिली. यावेळी संचालक डी. व्यंकटेश्वरलु यांनी संशोधन विभागातील विविध संशोधने पाहून सविस्तर माहिती जाणून घेतली. संशोधन प्रकल्प अधिकारी प्रा. गजेंद्र कुलकर्णी यांनी डी. ए.ई. आऊटरिच सेंटर मधील विविध संशोधनांची सविस्तर माहिती दिली.

 यावेळी न्यू इंग्लिश स्कूल अनवलीला भेट देवून तेथील विद्यार्थ्यांना देखील संचालक डी. व्यंकटेश्वरलु यांनी मार्गदर्शन केले. तसेच अनवलीमध्येच स्वेरीच्या संशोधन विभागाअंतर्गत सुरु असलेली पाणी शुद्धीकरण संयंत्र,तसेच पाणी परीक्षण, माती परीक्षण आदी महत्वाच्या संशोधनांची माहिती जाणून घेतली. येथील संशोधने पाहून व्यंकटेश्वरलु यांनी विशाखापट्टणममधील बी.ए.आर.सी. मध्ये सुरु असलेल्या संशोधनांची माहिती दिली. तसेच प्राध्यापकांना संशोधनाविषयी बहुमोल मार्गदर्शन करून विशाखापट्टणममधील बी.ए.आर.सी.च्या संशोधन विभागातील सुपर कॉम्प्यूटिंग सुविधेचा देखील वापर करण्याची परवानगी दिली. स्वेरीतील संशोधने व पी.एच.डी. धारकांची संख्या पाहून संचालक डी. व्यंकटेश्वरलु भाराऊन गेले.यावेळी आकृती प्रकल्पाच्या सौ. स्मिता मुळे, एस.एन.दत्ताजी, सीताराम शर्मा, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी.नाडगौडा, उपप्राचार्य प्रा. एस.एन. कुलकर्णी,अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, समन्वयक डॉ. ए.बी.शिंदे यांच्यासह स्वेरीतील संशोधक प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.एम.एम.भोरे यांनी केले तर आभार संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मानसी पाटील यांनी मानले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *