👁 10 Views

समाधान (दादा) अवताडे यांच्या नोकरी महोत्सव कार्यक्रमास ऑनलाईन उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर LIVE 20 नोव्हेंबर 2018

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि. मंगळवेढा, आवताडे  स्पिनर्स मंगळवेढा, आवताडे शुगर मंगळवेढा, चे चेअरमन  समाधान महादेव आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत  तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, पंढरपूर येथे रविवार दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ८:०० ते ५:०० वाजेपर्यंत भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या  नाव नोंदणीसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. या नोंदणीतून  पंढरपुर मंगळवेढा या शहरांमधून व पंढरपूर मंगळवेढा  तालुक्यातील सर्व खेडे गावातून बेरोजगार तरुण-तरुणींनी संख्या भरपूर प्रमाणात  असल्याचे दिसून आले आजपर्यंत सुमारे ३००० पर्यंत  पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील बेरोजगार तरुण-तरुणींनी तसेच अपंग बेरोजगारांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदवले आहे.  समाधान (दादा) आवताडे  यांनी  सुशिक्षित  बेरोजगार तरुण-तरुणींनी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी (जॉब फेअर) चे आयोजन केले आहे. 



 

या कामात त्यांनी  पुण्याच्या जोब शोकेस  या आयटी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेची मदत घेतले आहे. या संस्थेच्या पुढाकाराने  पुण्या -मुंबईसह  बहुराष्ट्रीय  ५०  कंपन्यांचे अधिकारी या मेळाव्यासाठी मुलाखत घेण्यासाठी व  ‘सिलेक्शन’ करण्यासाठी  येणार आहेत.  यामध्ये किमान इयत्ता १ पास ते सर्व पदवीधर पदव्युत्तर, सर्व आयटीआय ट्रेड, सर्व डिप्लोमा, सर्व डिग्री
(० ते १० वर्षेपर्यंत कामाचा अनुभव असलेले सर्व उमेदवार, वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण झालेले असावे) यामध्ये नोकऱ्या उपलब्ध असणारी विविध क्षेत्रे मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, रिटेल,  फार्मसी, बीपीओ, केपीओ, फायनान्स, टेलिकॉम, फॅसिलिटी, इन्शुरन्स, आवताडे स्पिनर्स, एस. एम. आवताडे कन्स्ट्रक्शन, आवताडे शुगर  आदी कंपन्यांचा त्यामध्ये समावेश  आहे  या भव्य अशा नोकरी महोत्सवासाठी महाराष्ट्रातून तसेच पूर्ण भारतभरातून व भारताबाहेरील काही तरुणांनी  तसेच अपंगांनासुद्धा  आपले नाव नोंदवले आहे. येणाऱ्या 25 नोव्हेंबर 2018 रोजी श्री संत तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये पुण्या -मुंबईसह ५० कंपन्या सहभागी होणार आहेत. 

या भव्य नोकरी महोत्सव कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद  आहे या  महोत्सवात  सुशिक्षित  बेरोजगार तरुण-तरुणींना  जागेवरच त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरीचे ओफीर लेटर देण्याचा प्रयत्न राहील.   
ऑफलाईन अर्ज समाधान (दादा) आवताडे जनसंपर्क कार्यालय, भक्तिमार्ग, अश्विनीता गॅस गोडाऊन शेजारी, पंढरपूर. व माननीय श्री. समाधान (दादा) आवताडे जनसंपर्क कार्यालय,  खंडोबा गल्ली, मंगळवेढा. येथे  आपले अर्ज जमा करण्याची  सोय स.११.०० ते सा. ५.०० या कार्यालयीन वेळेत  उपलब्ध केली आहे. तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी अर्जदार आपले अर्ज http://goo.gl/eBEYXk या गुगल लिंकवर तसेच   goo.gl/eBEYXk
या whatsapp link व facebook लिंकवर  वर नोंदवू शकता.

या भव्य नोकरी महोत्सवात आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी  अल्पोपाहाराची सोय केलेली आहे. या भव्य नोकरी महोत्सव कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अजूनही उरलेल्या चार दिवसामध्ये  भरपूर फॉर्मची  नोंदणी होईल असे संयोजकांना  वाटते.  
समाजसेवक संतोष कवडे व  समाधान (दादा) आवताडे युवामंच, पंढरपूर व मंगळवेढा मधील सर्व सहकारी या मेळाव्याच्या तयारीला विशेष परिश्रम घेत आहेत. पंढरपुर मंगळवेढा या शहरांमधून व पंढरपूर मंगळवेढा  तालुक्यातील सर्व खेडे गावातील  सुशिक्षित  बेरोजगार तरुण-तरुणींना या भव्य नोकरी महोत्सवात  सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे नियोजनकर्त्यानी सांगितले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *