👁 9 Views

समाधानदादा आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम

पंढरपूर LIVE 21 नोव्हेंबर 2018 

श्री. संत दामाजी साखर कारखाना लि. मंगळवेढा चे चेअरमन समाधान (दादा) आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

समाधान (दादा) आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाखरी येथे मोफत डोळे तपासणी शिबिर…. गादेगाव येथील दलित वस्ती येथे साखर वाटप 


 समाधान(दादा) आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाखरी येथे इनलॉक्स बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाखरी येथील ज्येष्ठ नागरिक नामदेव श्रीरंग गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दयानंद पवार (परीट समाज राज्य संघटक)  मुन्ना मलपे शिवाजी मदने (माजी संचालक चंद्रभागा) डॉ. सागर लुबे डॉ. नितिन पाटिल (पुणे) यांची होती. 
या शिबिरांमध्ये एकूण ३४८ लोकांची डोळे तपासणी झाली असून अल्प दरामध्ये चष्मेवाटप १२२ जणांना देण्यात आले व ऑपरेशन साठी १९ तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सर्वतोपरी सहकार्य करणारे संजय अभंगराव पोपट गायकवाड सदाशिव मस्के संजय घोडके वैभव ननवरे सुधाकर गायकवाड सुनील गायकवाड पांडुरंग पोरे संजय राऊत रामचंद्र पांढरे सनातन लोखंडे रमेश लोखंडे ईलाही मुजावर आशपान शेख सुभाष शिंदे ज्ञानेश्वर पांढरे सर्जेराव पांढरे सुरेश भंडारे तसेच समाधान (दादा) आवताडे युवा मंच्यातील  कार्यकर्ते, समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राऊत सर यांनी केले तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले.

गादेगाव येथील दलित वस्ती येथे साखर वाटप

समाधान (दादा) आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त गादेगाव येथील दलित वस्ती येथे साखर वाटप करण्यात आली गणेश फाटे मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री गणेश फाटे हे यावेळी बोलताना म्हणाले समाधान (दादा) आवताडे चेअरमन श्री. संत दामाजी साखर कारखाना लि. मंगळवेढा यांनी सभासदांना दहा रुपये दराने साखर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कन्स्ट्रक्शनच्या कामांमध्ये त्यांची खूपच ख्याती आहे सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर तुकाराम मुंडेसाहेब यांनी  समाधान (दादा) आवताडे यांचा सोलापूर जिल्ह्यातील पहिला विशेष सत्कार केला. याशिवाय सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे या आणि इतर सर्व कामांमध्ये मा.श्री. समाधान (दादा) आवताडे हे लोकांना मदत करत असतात म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून गादेगावातील दलित वस्ती येथे गणेश फाटे मित्र मंडळ अध्यक्ष गणेश फाटे यांनी साखर वाटपाचा कार्यक्रम केला यावेळी संजय बागल विनोद भोसले बालाजी डोंगरे अमोल बागल सोमनाथ पवार गणेश शेंडगे राहुल गिड्डे पोपट बागल शशी पाटील अनील शेंडगे मधुकर बागल समाधान पाटील शेखर हुंडेकरी अजित नागणे सिद्धनाथ बागल महेश खवनकर पिंटू काळे नाना नागणे आदी कार्यकर्त्यांनी साखर वाटपाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *