पंढरपूर LIVE 20 नोव्हेंबर 2018
भुवैकुंठ पंढरीतील मातोश्री मीराबाई महाराज सुर्यवंशी सेवाश्रम व शिवक्रांती_ युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अतिशय स्तुत्य असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पंढरीतील गोर-गरीब, गरजु माता-भगिणींना उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी सचिन _ढोले यांच्या शुभहस्ते हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.
साड्या वाटप झाल्यानंतर उपस्थित सर्व माता-भगिणींना सुग्रास भोजनही देण्यात आले. यावेळी नुतन नगरसेवक निवास बोरगावकर, नगरसेवक, लखन _चौगुले, मीराबाई सेवाश्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.नागनाथ महाराज काळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवक्रांतीचे संस्थापक-अध्यक्ष दत्तात्रय काळे, सल्लागार अजिंक्य शिंदे, शहराध्यक्ष सागर चव्हाण, शहर कार्याध्यक्ष सोपानकाका देशमुख, राकेश मोरे, कुणाल घुले, विकी काळे आदींनी परिश्रम घेतले.
तरुण पिढीतील समाजसेवकांचा हा उपक्रम खुप भावला-प्रांताधिकारी सचिन ढोलेहल्लीच्या बदलत्या काळात कांहीजण स्वत:च्या आई-वडिलांना, भावंडांना व बायका-लेकरांनाही व्यवस्थित सांभाळताना आढळत नाहीत. परंतु कांही तरुण समाजसेवक मात्र अतिशय मौलिक व कौतुकास्पद कार्य करताना आढळून येताहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजेच शिवक्रांती युवा संघटनने आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम आहे. हा उपक्रम मला खुप भावला. तरुण समाजसेवकांच्या मनात असा विचार येणे व तो आमलात आणणे ही खुप मोठी गोष्ट आहे. ‘शिवक्रांती’ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविल्या या उपक्रमापासून इतरांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल व असे उपक्रम सामाजिक संघटना व संस्था राबवतील. असे मत यावेळी बोलताना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








