पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018
मंगळवेढा येथील बोराळे नाका परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अंत्यत दयनीय झालेली आहे सद्य परिस्थितीत स्वच्छ सर्वेक्षणाचे चौकाचौकात डिजीटल बोर्ड लावण्यात आलेले आहेत. तसेच मंगळवेढा नगरपरिषदेने स्वच्छ मंगळवेढा सुंदर मंगळवेढा नाराही दिला आहे पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. यापूर्वी वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मंगळवेढा शहर हागणदारी मुक्त करण्यात आलेले आहे याकरिता त्या-त्या परिसरातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले होते परंतु सध्या बोराळे नाका परिसरातील शौचालयाची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे.
यासाठी वारी परिवाराने केलेल्या सर्व्हेमध्ये असे लक्षात आले आहे की, शौचालयाचे पाणी बाजुच्या खड्यात सोडण्यात आलेले आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरूण पूर्ण परिसर अस्वच्छ झालेला असून अनेक रोंगाचा प्रसार होत आहे तसेच अनेक वर्ष ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्याचबरोबर महीलांना व लहान मुलांना उकीरडा व गटारातुन शौचालयात जावे लागत आहे खरोखरच जीवंतपणीच नागरीकांना नरकयातनांचा अनुभव येत आहे.
तसेच आडोसा व्यवस्थित नसल्यामुळे महीलांची कुचंबना होत आहे नगरपरिषदेकडे तक्रार केल्यास तात्पुरती स्वच्छता केली जाते व स्वच्छता विभाग व बांधकाम विभागाकडुन टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात.मंगळवेढा शहरातील सर्वच महिला शौचालयाचे दरवाजे व किरकोळ दुरूस्ती तात्काळ करणे आवश्यक असताना डेंडर व मिटींगची कारणे पुढे केली जातात. महाराष्ट्र शासनाने स्वच्छतेच्या बाबतीत कंबर कसली तरी मंगळवेढा नगरपरिषद याबाबतीत उदासीन दिसत आहे त्यामुळे पुन्हा एकदा वारी परिवारासारख्या सामाजिक संस्थेने लक्ष्य घालण्याची गरज आहे अशी चर्चा नागरीकांतुन व्यक्त केली जात आहे अन्यथा उघड्यावरती लोक शौचालयास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी नगरपरिषदेच्या प्रशासन विभागाने तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








