पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018
पंढरपूर : पंढरीचे थोर सुपुत्र शौर्यचक्रप्राप्त हुतात्मा मेजर कुणाल गोसावी यांचा दुसरा हुतात्मा शौर्य दिन पंढरपूर येथील त्यांचे निवास्थान असलेल्या दाळे गल्ली येथे नुकताच संपन्न झाला.
या वेळी वीर पिता मुन्नागिर गोसावी, वीर माता वृंदाताई गोसावी यांच्या हस्ते मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी कवठेकर प्रशालेतील मेजर कुणालचे शिक्षक व्ही.एम.कुलकर्णी सर यांनी मेजर कुणाल गोसावी यांचे शालेय शिक्षण व आठवणीला उजाळा देऊन त्यांचे गौरवस्पद कार्य आणि वीर हौतात्म्य याची रोमहर्षक कहाणी सांगितली.
मेजर कुणाल यांच्या बलिदानामुळे पंढरीची ओळख केवळ अध्यात्मिक न राहता ती वीर हुतात्म्यांची नगरी म्हणून झाल्याचे सांगितले. एस.एम.कुलकर्णी सर यांनी दोन वर्षांपूर्वी जम्मु जवळील नगरोटा अतिरेकी हल्ल्यात मेजर कुणाल गोसावी यांची शौर्यगाथा सांगितली. या वेळी गल्लीतील शेकडो अबालवृद्धांनी मेणबत्ती प्रजवलन केले. हा कार्यक्रम दाळे गल्ली मित्रमंडळ, महिला मंडळ, मेजर कुणाल प्रेमी युवक यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमास गोसावी परिवारातील सदस्य व गल्लीतील सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com










