पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2019
जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आज काश्मीरच्या पुलवामा या ठिकाणी असलेल्या अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. या घटनेनंतर माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी त्यांचा संताप ट्विट द्वारे व्यक्त केला आहे. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला आम्ही घेऊ असे सिंह यांनी म्हटले आहे.
भारतीय जवान आणि देशाचा नागरिक असल्याने पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच माझे रक्त खवळले आहे. या भ्याड हल्ल्याचा मला प्रचंड संताप आला आहे. या भ्याड हल्ल्यात देशाचे चाळीस जवान शहीद झाले. मी त्या शहीद जवानांच्या शौर्याला नमन करतो. शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला आम्ही घेऊ अशा आशयाचे ट्विट व्ही. के. सिंह यांनी केले आहे.
गुरुवारी दुपारच्या सुमारास पुलवामा जिल्ह्यात CRPF च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना दहशतावाद्यांनी लक्ष्य केले. 2 हजार 500 जवानांचा ताफा 70 बसेसमधून जात होता त्याचवेळी स्फोट घडवण्यात आला या स्फोटात आणि भ्याड हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले आहेत. देशभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जातो आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
-: कार्यालय :-
शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







